कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त इतका बोनस जाहीर; रविंद्र चव्हाण यांची माहिती
डोंबिवली: कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १९ हजार ५०० रुपयांचा बोनस जाहीर झाला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनेक कर्मचारी, त्यांच्या संघटना मला भेटल्या होत्या, त्या सगळयांचे म्हणणे घेऊन मी त्यांच्या मागण्या शासनाकडे मांडल्या, त्यानंतर आता त्या सगळ्यांना आता बोनस जाहीर झाला आहे.
हेदेखील वाचा- कोपरगाव तालुक्यात पीक विम्याची तुटपुंजी भरपाई; शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विनंतीचा मान राखून बोनस दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांचे कर्मचाऱ्यांनी आभार मानले. १९,५०० एवढा बोनस जाहीर करण्यात आला असून त्यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांना आदेश देण्यात आले असल्याचे रविंद्र चव्हाण म्हणाले.
कोविड काळातील पदभरती, २७ गावातील कर्मचारी अशा सगळ्यांनाच बोनस मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हा बोनस दिवाळीच्या आधी सर्वांना वितरित होईल अशी माहिती देखील रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त १९ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हे सानुग्रह अनुदान कामगारांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- निवडणूका जाहीर होताच मनसे ॲक्शन मोडमध्ये; राज ठाकरेंनी केली मोठी घोषणा
महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना १९ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. महाालिका आयुक्तांनी दिलेल्या मंजूरीनुसार कामय स्वरुपी अधिकारी कर्मचारी, प्रतिनियुक्तीवरील अधिकारी, ठोक पगारी, रोजंदारी, हंगामी स्वरुपाचे कर्मचारी, परिवहन उपक्रमातील कर्मचारी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, सेविका, दाई, सर्व शिक्षा अभियांनातील कर्मचारी, समूह संघटक व्यवस्थापक, एयूएचएमचे कामगार, राष्ट्रीय क्षयरोग, कुष्ठरोग, एड्स निर्मूलन उपक्रमातील कामगार, आपत्ती व्यवस्थापनाती कामगार आदींना हे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. महापलिका प्रशासनाकडून सानुग्रह अनुदानासाठी ९ कोटी ६३ लाख ६१ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत २८ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम तीन हजारांनी अधिक आहे. बालवाडी शिक्षक आणि आशा वर्कर्स यांच्यासाठी देखील बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ नोव्हेंबर रोजी बीएमसी कर्मचाऱ्यांना २६,००० रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत २८ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.