एमएमआरडीएचा हलगर्जीपणा; रस्त्याला भगदाड पडल्याने सिमेंट मिक्सरचा भीषण अपघात
विजय काते: मीरा भाईंदरमधील काशिमिरा परिसरात भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. हॉटेल अमर पॅलेसजवळील रस्त्याला भगदाड पडल्याने सिमेंट मिक्सरचा ट्रक खड्ड्यात पडून मोठा अपघात झाला. या अपघातात सिमेंट मिक्सर ट्रक चालक जागीच ठार झाला झाला तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच काशिमिरा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.सिमेंट मिक्सरचा ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात पोलिस दलाला यश आलं.सध्या तेथे मेट्रोच काम सुरु आहे आणि मेट्रोच्या पिलरच्या खालील रस्ता अचानक खचला जावून, मोठं भगदाड पडलं होतं.असं सांगण्यात आलं आहे.
या सगळ्या दुर्देवी घटनेला एमएमआरडी कारणीभूत असल्य़ाचं म्हटलं जात आहे. एमएमआरडीचा हलगर्जीपणा आणि रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघात होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. एकीकडे या अपघातावर स्थानिकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे तर दुसरीकडे मनसेने देखील .या अपघातावर संताप व्यक्त केला आहे. झालेला प्रकार हा निंदनीय आहे याचाच निषेधार्थ आज मनसे रस्त्यावरती उतरून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून नंतरच पुढील काम करायला सुरुवात करावे अशा मनसेने इशारा दिला आहे. या सगळ्या प्रकरणावर काशिमीरा पोलीस सखोल चौकशी करत आहेत. या सगळ्या घटनेवर मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी एमएमआरडीवर ताशेरे ओढले आहेत. राणे म्हणाले की, या दुर्देवी घटनेला एमएमआरडीचा भोंगळ कारभार जबाबदार आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे.पीलरच्या खाली माती नसून थूपपट्टी लावण्यात आली त्यामुळे त्यामुळे हा अपघात झाला आहे.
गेले तीन वर्ष मेट्रोचं काम सुरु असून या तीन वर्षात या ठिकाणी भीषण अपघात झालेले आहेत असं येथील स्थानिकांचं मत आहे. याुपुर्वी देखील एका कामगाराच्या डोक्यावर ब्लॉक पडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.पावसाळ्यात देखील तीन दुचाकी आणि एता रिक्षाचा या ठिकाणी अपघात झाल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. या सगळ्या प्रकरणी एमएमआरडीची तक्रार मनपा आयुक्तांकडे केली असता एमएमआरडी अधिकाऱ्यांनी स्थानिकांशी आरेलानवी केली आहे. या मेट्रो प्रकल्पाचं दिवस रात्र काम सुरु असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेबाबत कोणत्या उपाय योजना एमएमआरडी आणि मनपाकडून करण्यात आलेल्या नाही.या परिसरात नागरिक रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत असवसल्याची स्थानिकांनी खंत व्यक्त केली आहे. या सगळ्या परिस्थितीनंतर आता तरी मनपा अधिकाऱ्य़ांनी या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष न करता एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई कण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
.