भ्रष्ट इस्टेट एजंट आणि सदनिका भाडेकरूवर कारवाई व्हावी, मनसेची मागणी (फोटो सौजन्य-ट्विटर)
मिरा भाईंदर शहरात काही दिवसापूर्वी भाडयाने घर देणे घेणे या विषयांच्या वादावरूण पोलीस हस्तक्षेप करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर गरम पाणी ओतून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये पोलीस बांधव जखमी झाले होते, याच विषयाच्या अनुसरून आज मिरा भाईंदर शहरातील मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे उपस्थित केले.
यावेळी मिरा भाईंदर शहरात सदनिका मालक यांची भाडेकरू यांच्याकडून फार मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे प्रकार घडत आहेत. सदनिका मालक आणि भाडेकरून यांच्या सर्व अधिकृत पत्रव्यवहार होते आणि त्यांच्यात तसा करार देखील होतो. तसेच सरकारला त्याबाबत टॅक्स देखील भरला जातो. सर्व अधिकृत प्रक्रिया होऊन देखील आपल्या शहरातील कितेक सदनिका भाडेकरून हे भाडेत्वाचा करार संपला असला तरी सदनिका मालकास सदनिका खाली करून देत नाही. या उलट भाडेकरार संपला तरी भाडे न भरता मोफत राहतात आणि सदर सदनिका हे सोडण्यास नकार देतात.
या उलट सदनिका मालकालाच दमदाटी करून तेथून निघून जाण्यास भाग पाडतात. तसेच सदर सदनिकेवर कब्जा करून राजरोस पणे तेथे राहतात आणि सदनिका मालक हा भाडेकरू विरोधात तेथील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास गेल्यावर तेथे त्यांना कोणत्याही प्रकारे मदत केली जात नाही. त्यांना सरळ सरळ सांगितलं जात की, सदर प्रकरण हे सिव्हिल आहे. तर आम्ही काही करू शकत नाही आणि त्यांना निराशाने परतावं लागते. मग तेच सदनिका धारक हे आमच्या सारख्या राजकीय पदाधिकारी याच्याकडे मदत मागण्यासाठी येतात आम्ही आमच्या परीने त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.
परंतु आपल्या पोलीस प्रशासनावर विश्वास हा नागरिक गमावत आहे. तरी आपण आपल्या हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनला सूचित करावे की, अशा प्रकारे जर कोणती तक्रार आल्यास त्यांना योग्य ती मदत करा, असा आदेश आपण द्यावे आणि निदान समोरील भाडेकरूंना पोलीस स्टेशनला बोलून समज द्यावेत आता नियमानुसार कारवाई करावी एवढी जरी केली तरी भ्रष्ट सदनिका भाडेकरून तसेच भ्रष्ठ एजंट वर वचक बसेल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.