फोटो सौजन्य: iStock
मार्केटमध्ये विविध सेगमेंटच्या बाईक ऑफर होत असतात. यात सर्वात जास्त डिमांड बजेट फ्रेंडली बाईकला मिळत असली तरी हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या फ्यूचरिस्टिक लूक असणाऱ्या हाय परफॉर्मन्स बाईक ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे कावासाकी.
आज अनेक सेलिब्रेटी आणि रायडर्सच्या बाईक कलेक्शनमध्ये कावासाकीच्या बाईक पाहायला मिळतात. यातही अनेक तरुणाचे स्वप्न असते की त्यांच्याकडे कावासाकीची बाईक असावी. नुकतेच या कंपनीने आपल्या तीन बाईक अपडेट केल्या आहेत.
कावासाकी त्यांच्या 2026 च्या लाईनअपला अपडेट करण्यात व्यस्त आहे. कंपनीने त्यांच्या लोकप्रिय मध्यम-वजनाच्या बाईकचे 2025 चे व्हर्जन Kawasaki Ninja 650, Versys 650, Vulcan S 2025 ला नवीन फीचर्स आणि रंग पर्यायांसह सादर केले आहे. चला या अपडेटेड बाईकबद्दल जाणून घेऊयात.
गोंडलच्या महाराजांजवळ आहे AMG च्या 9 पॉवरफुल कार्स, कलेक्शन पाहून व्हाल हैराण
ही कावासाकी बाईक जगातील सर्वात लोकप्रिय मिडल-वेट स्पोर्ट्स टूरर बाइक्सपैकी एक आहे. कंपनीने त्यांचे 2026 मॉडेल काही अपडेट्ससह आणले आहे. यात लाइम ग्रीन आणि मेटॅलिक मॅट व्हाइट टिश्यू सिल्व्हर x मेटॅलिक फ्लॅट स्पार्क ब्लॅक असे दोन नवीन रंग पर्याय देण्यात आले आहेत. यासोबतच, या बाईकमध्ये 4.3-इंचाचा कलरफुल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे, जो नेव्हिगेशन आणि व्हॉइस कमांडच्या सपोर्टसह येतो.
Ninja 650 प्रमाणेच, कावासाकीची ही मध्यम-वजनाची ॲडव्हेंचर टूरर बाईक जगभरात लोकप्रिय आहे. एप्रिल 2025 मध्ये, त्यात काही अपडेट्स देण्यात आले होते, ज्या अंतर्गत त्यात मेटॅलिक मॅट ग्राफीनस्टील ग्रे रंग देण्यात आला होता. याला मेटॅलिक डीप ब्लू एक्स मेटॅलिक स्पार्क ब्लॅक हा नवीन रंग देण्यात आला आहे, जो कावासाकीच्या पारंपारिक पॅलेटपेक्षा वेगळा आहे. यात 4.3-इंचाचा कलरफुल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जो नेव्हिगेशन आणि व्हॉइस कमांडचे फीचर्स वापरण्यासाठी कावासाकीच्या राइडोलॉजी ॲपद्वारे कनेक्ट केला जाऊ शकतो.
ड्रायव्हिंग दरम्यान केल्यात 4 चुका, कार मायलेज येईल धाडकन खाली; सतत भरावे लागेल पेट्रोल
ही कावासाकीची मध्यम वजनाची क्रूझर बाइक आहे. याचं 2026 वर्जनही सादर करण्यात आलं आहे. मात्र, यात निंजा 650 आणि वर्सेस 650 प्रमाणे नेव्हिगेशन आणि व्हॉईस कमांडसाठी कलर एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलेले नाही. नव्या Vulcan S मॉडेलला एका नवीन रंगात सादर करण्यात आलं असून तो रंग मेटॅलिक ग्रेफाइट ग्रे एक्स मेटॅलिक स्पार्क ब्लॅक आहे.