कल्याण: कल्याणमधून डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. 10 वर्षाच्या मुलाला टायफाईड आणि निमोनियाची लागण झाला होती. त्याच्या उपचारासाठी त्याच्या कुटुंबीयांनी कल्याण आधारवाडी चौकातील मनोमेय मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुलाचा उपचार करून या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र संबंधित डॉक्टरने या मुलाला टायफाईड निमोनियाच्या औषधांसह दुसऱ्याच रुग्णाची औषधे देखील प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिली आहे. मुलाचे नातेवाईक मुलाला घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे इंजेक्शन घेण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. जर ही औषधें आजारी मुलाने घेतली असती तर त्याच्या आरोग्याला उपाय होण्याऐवजी अपाय होण्याची शक्यता होती.
नेमकं काय घडलं?
कल्याण पश्चिम परिसरात राहणारा दहा वर्षाचा सिद्धार्थ गायकवाड याला टायफॉईड आणि निमोनियाची लागण झाली होती. त्याला कल्याण आधारवाडी चौक परिसरातील मनोमेय या रुग्णालयात 23 ऑगस्टला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 25 ऑगस्टला सिद्धार्थला या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी संबंधित डॉक्टरांनी त्याला काही औषध लिहून दिली.या औषधांच्या प्रीस्क्रिप्शन मध्ये एका दुसऱ्या रुग्णाचे देखील औषध लिहून देण्यात आले . सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी प्रीस्क्रिप्शनवर दिलेले औषध विकत घेतली आणि ते घरी गेले. मंगळवारी सकाळी मुलाला इंजेक्शन देण्यासाठी ते एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेले असता त्या डॉक्टरने हे प्रीस्क्रिप्शन वाचले.तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
या औषधांच्या प्रीस्क्रिप्शन मध्ये एका दुसऱ्या रुग्णाचे देखील औषध लिहून देण्यात आले . सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी प्रीस्क्रिप्शनवर दिलेले औषध विकत घेतली आणि ते घरी गेले. मंगळवारी सकाळी मुलाला इंजेक्शन देण्यासाठी ते एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेले असता त्या डॉक्टरने हे प्रीस्क्रिप्शन वाचले.
प्रिस्क्रीप्शनमधील औषध पाहून त्याला धक्काच बसला. टायफॉईड आणि निमोनियाच्या औषधांसह डायबेटीस आणि रक्त पातळ करण्याचे देखील औषध त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आले होते. त्याने याबाबत तात्काळ कुटुंबीयांना माहिती दिली.
कारवाईची मागणी
मुलाच्या कुटुंबीयांनी याबाबत मनोमेय रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला. मुलाच्या उपचारात निष्काळजीपणा करत चुकीचे औषध देणाऱ्या संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर याबाबत मनोमेय रुग्णालय प्रशासनाचे डॉ. सनी सिंग यांनी संबंधित डॉक्टरकडून चुकून दुसऱ्या रुग्णाचे देखील औषध या दहा वर्षाच्या मुलाच्या प्रीस्क्रिप्शन मध्ये लिहिण्यात आल्याचे सांगितले. चुकीचे औषध दिलायचं लक्षात येताच वेळीच मुलाच्या नातेवाईकांना औषध न देण्याचे कळवल्याचे सांगितले.
बियर आणायला सोबत न जाणं भोवलं; पुण्यात तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण