Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News : नारळाचे झाड अंगावर कोसळून राहुल पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; मुर्धा गावावर शोककळा

मूर्धा गावातील माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष अशोक बळवंत पाटील यांचे सुपुत्र राहुल अशोक पाटील यांचे नारळाचे झाड अंगावर कोसळल्याने झालेल्या गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे मूर्धा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 03, 2026 | 12:29 PM
नारळाचे झाड अंगावर कोसळून राहुल पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; मूर्धा गावावर शोककळा

नारळाचे झाड अंगावर कोसळून राहुल पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; मूर्धा गावावर शोककळा

Follow Us
Follow Us:
  • सदानंद नगर येथे दुर्दैवी घटना
  • नारळाचे झाड अंगावर पडून राहुल पाटील यांचे निधन
  • राहुल पाटील यांच्या निधनाने परिसर हळहळला
विजय काते, मीरा भाईंदर : मान्सून आला की मुंबईकरांची पहिली चिंता म्हणजे ठिकठिकाणी झाडे कोसळून अपघात होतात. दोन दिवसापूर्वीच चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर पडलेल्या झाडामुळे 11 वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. चेंबूरमधील ही घटना ताजी असताना चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या परिसरातही झाड कोसळण्याची घटना घडली आहे. चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात भलं मोठं झाड रस्त्यांवर उभ्या वाहनांवर कोसळलं. झाड कोसळल्याने रस्त्यावर उभ्या असणाऱ्या लोकांची एकच धावाधाव झाली. याचदरम्यान मीरा भाईंदरमधून एक बातमी समोर येते, ती म्हणजे मूर्धा गावातील माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष तसेच शिलोत्री आगर मंडळाचे अध्यक्ष अशोक बळवंत पाटील यांचे सुपुत्र राहुल अशोक पाटील यांचे शुक्रवारी (3 जुलै) झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने पाटील कुटुंबासह संपूर्ण मूर्धा गावावर शोककळा पसरली असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत 20 झाडे कोसळली; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पाटील हे शुक्रवारी दुचाकीवरून मेन रोडने प्रवास करत होते. यावेळी सदानंद नगर, राई ऑफिस परिसरात अचानक एक नारळाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. या अनपेक्षित आणि भीषण दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. या घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत राहुल पाटील यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू ठेवले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

राहुल पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच मूर्धा गावासह परिसरात शोककळा पसरली. सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. पाटील कुटुंबीयांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक आणि जीर्ण अवस्थेतील झाडांची वेळेवर तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

मुंबईत मुसळधार पावसामुळे केवळ एका दिवसात (२ जुलै रोजी) झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या एकूण ९१ तक्रारी महानगरपालिकेकडे प्राप्त झाल्या。 यातील १३ तक्रारी शहरात, २२ पूर्व उपनगरात आणि सर्वाधिक ५६ तक्रारी पश्चिम उपनगरात नोंदवल्या गेल्या。 याआधी जुलैच्या सुरुवातीला सलग २४ तासांत ९९ पेक्षा जास्त झाडे व फांद्या पडल्याच्या घटना घडल्या होत्या.

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पातील भूसंपादन वाद अंतिम टप्प्यात; ‘सेव्हन इलेव्हन’ला 24.24 कोटींची भरपाई

Web Title: Rahul ashok patil dies after coconut tree falls murdha news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Monsoon Update
  • Road Accident

संबंधित बातम्या

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत
1

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत

Mira Bhayandar News: ‘महासभा लाईव्ह का नाही?’ मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर समाजसेवकांचे ठिय्या आंदोलन
2

Mira Bhayandar News: ‘महासभा लाईव्ह का नाही?’ मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर समाजसेवकांचे ठिय्या आंदोलन

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत पुन्हा राजकीय रणकंदन; शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग
3

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत पुन्हा राजकीय रणकंदन; शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
4

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.