"तर दिव्याचा मुंब्रा होण्यास वेळ लागणार नाही"; राजू पाटलांचा विरोधकांना टोला
ठाणे: दिवावासियांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे स्टेशन जवळील उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र बरेच महिने लोटून गेले तरी अजूनही याचं काम पूर्ण झालं नाही. याबाबत बोलताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उड्डाणपुलाच्या अपूर्ण कामावर खंत व्यक्त केली आहे. राजू पाटील म्हणाले की, आत्ता सालपण विसरलो आम्ही, कुठल्या साली केले होते. तेव्हा जे काम चालू केले हेते. जो डिपीआर आणि डिझाईन अनेक वेळा बदली झालेली आहे. हीच पद्धत पलावा पूलाबाबतही दिसेल. पत्री पूलाला देखील अनेक वेळा चेंजेंस केले. याच्यात एक का’मन गोष्ट आहे. मलंग नावाचा कंत्राटदार काम करतो. त्याला रा’केट सायन्स सापडले आहे. त्यापद्धतीने तो काम करीत आहेत. तुमचा प्रमाणे आम्हाला ही प्रश्न आहे हे काम कसे आणि कधी पूर्ण होईल. याठिकाणचे भूमिपूत्राशी बोलून त्यांना कन्व्हीन्स केले आहे जागेसाठी. ती जागा देऊन त्या पूलाचे काम केले जाईल अशी आशा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा-“हिंम्मत असेल तर उध्दव ठाकरेंना अडवून दाखवावं” , परशुराम उपरकरांचं नितेश राणेंना आव्हान
कल्याण ग्रामीण मतदार संघातून निवडणूक लढविणारे मनसेचे उमेदवार आमदार राजू पाटील यांच्या दिवायेथील निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मनसे पदाधिकाऱ््यांनी एकच जल्लाेष केला. मनसेत या वेळी विविध कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यांचे आमदार पाटील यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी राजू पाटील म्हणाले की, दिव्याने मला कायमच साथ दिली आहे. यावेळीही दिवेकरांनी मला साथ द्यावी असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. कल्याण ग्रामीणमधून शिंदेनेने उमेदवार दिला आहे. याविषयी आमदार पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कल्याण लोकसभे पूर्वी आम्ही मेळावा घेतला. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.
हेही वाचा-कॉंग्रेस दलित-ओबीसींचे आरक्षण काढून मुस्लिमांना… ! अमित शाह यांचा खळबजनक आरोप
लोकसभेच्यावेळी राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी , विकासकामं तुम्ही करावीत असं आवाहन आम्ही महायुतीला केलेलं होतं. यापलीकडे काही नव्हतं. मात्र इतरांची कामे पुढे सरकताना दिसली. आम्ही सांगूनही आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. त्यामुळे आमची कामं तशीच थांबून राहिली. त्याचवेळी मला कळून चुकलं की, यांच्या नियतीत खोट आहे, असं राजू पाटील म्हणाले. पुढे पाटील म्हणाले की, दिव्याची खासियत आहे, इथे एका समाजाला थारा दिला जात नाही. घर आणि गाळे दिले जात नाही. हळूहळू काही समाजाच्या नावाने घुसखोरी सुरु आहे. काही नेते मंडळी हे काम करीत आहे. त्यामुळे दिव्याचा मुंब्रा होण्यास वेळ लागणार नाही. अनेक घटक आहेत. त्याचा एकत्रित परिणाम होऊ शकतो. इथे ९९ टक्के इथे हिंदू समाज आहे, तो तसाच रहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असं राजू पाटील यांनी सांगितलं.