Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane :चैत्र नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात; नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भव्य शोभा यात्रा

चैत्र नवरात्र  आणि गुढीपाडव्यानिमित्ताने शोभा यात्रा देखील काढण्यात आली. गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने ठाण्यात कोपीनेश्वर मंदिर येथून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली .

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 30, 2025 | 01:50 PM
Thane :चैत्र नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात; नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात  भव्य शोभा यात्रा
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे / स्नेहा काकडे – धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त ठाणे पूर्व अर्थात कोपरी येथे श्री अंबे मातेचे भव्य मिरवणुकीसह वाजत गाजत मोठ्या उत्साहात आगमन झाले.या भव्य दिव्य मिरवणुकीत टाळ मृदुंग घेतलेले वारकरी, कोळी नृत्यावर ताल धरणारे कोळी बांधव, स्थानिक आदिवासी समाजाचे वारली नृत्य, लेझीम पथक, भारत नाट्यम्, कथकली, गुजराती गरबा, पंजाबी भांगडा असे विविध नृत्याविष्कार, पारंपरिक काठ्या, तलवारी, दांडपट्टा यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करणारी तरुणाई असे सर्व असल्याने चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण होते. अजून एक मुख्य आकर्षण होते ते राम पंचायतनाचा देखावा होता.

मुख्य मंडपात अंबे मातेचे भक्तिभावे पूजन केले. उद्या देवीचे विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.या मंगलसमयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लताताई एकनाथ शिंदे, वृषाली श्रीकांत शिंदे (शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक), प्रवक्ते व खासदार नरेश म्हस्के साहेब, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक राम रेपाळे, विभागप्रमुख एकनाथ भोईर, माजी नगरसेवक पवन कदम, योगेश जानकर, माजी परिवहन सभापती विलास जोशी, प्रकाश कोटवानी, रमाकांत मढवी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते, तमाम शिवसैनिक आणि ठाणेकर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ढोलताशांचा गजर अन् मराठमोठा उत्साह! ठाण्यातल्या शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

चैत्र नवरात्र  आणि गुढीपाडव्यानिमित्ताने शोभा यात्रा देखील काढण्यात आली. गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने ठाण्यात कोपीनेश्वर मंदिर येथून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली . या शोभयात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. शेकडो ठाणेकर नागरिक या शोभयात्रेत सहभागी झाले होते. या शोभयात्रेत आमदार संजय केळकर यांनी लिझिम खेळून केले नववर्षाचे स्वागत केले आहे.   केळकरांनी  लेझिम वर ताल धरून हिंदू नववर्षाचे स्वागत केले. वारकरी दिंडीमध्येही सहभागी झाले. चिंतामणी जांभळी नाका येथे शोभा यात्रेवर आमदार  केळकर यांनी पुष्पवृष्टी केली व तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार घातला. यावेळी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते.

Santosh Deshmukh Case : ‘…हे तर गृहखात्याचं अपयश’; संजय राऊतांची टीका

या शोभयात्रेत सहभागी होत असताना संजय केळकर यांनी कोपीनेश्वराचे दर्शन घेतले वनागरिकांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.लोढा अमरा येथील नववर्ष शोभायात्रेत आ. केळकर यांनी सहभाग घेऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या . लोढा अमरा येथील नागरिकांनी एकत्रित हिंदू नववर्षाची स्वागत यात्रा काढली. आ. केळकर यांच्या हस्ते नारळ वाढवून शोभयात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत लाठीकाठी, लिझीम, वारकऱ्यांची दिंडी असे मराठं मोळे खेळ आयोजित केले होते. केळकर यांनी यात सहभाग घेतला व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Thane auspicious start of chaitra navratri festival grand procession in thane against the backdrop of the new year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Gudi Padwa
  • thane

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
2

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
3

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.