Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : मनपाहद्दीत 124 अनधिकृत बांधकाम; अतिक्रमण विरोधी पथकाची मोठी कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रात, 19 जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 03, 2025 | 02:17 PM
Thane News : मनपाहद्दीत 124 अनधिकृत बांधकाम; अतिक्रमण विरोधी पथकाची मोठी कारवाई
Follow Us
Follow Us:

ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 124 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. 19 जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील एम के कम्पाऊंडमधील 18 इमारती पाडण्याचा देखील समावेश आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात, 19 जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. त्यासाठी नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे.

प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर, अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार आल्यास त्याची शाहनिशा करून ते बांधकामेही तोडण्यात येत आहे. या बांधकामांमध्ये वाढीव बांधकामांचा समावेश अधिक असल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे यांनी दिली.

महाराष्ट्रात बळीराजाची दयनीय अवस्था; राहुल गांधींनी समोर आणला शेतकरी आत्महत्येचा आकडा

महापालिका क्षेत्रात अनधिकत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, आरसीसी इमारतीचे बांधकाम, अनधिकृत बंगले, नाल्यालगतचे बांधकाम, आरक्षित भूखंडावरील गोडावूनचे बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे. हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरू आहे. तसेच, खाडी किनारा, अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली.

दरम्यान, शीळ येथील एम. के. कम्पाऊंड येथे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 21 इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे. त्यापैकी 18इमारती पाडण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे. परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेची अमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरुपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत. अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये उपायुक्त (परिमंडळ), सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅ्क्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येत आहे. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे.

सरकारच्या चुकीच्या धोरणांनी शेतकरी राजा हवालदिल; इस्लामपुरात राष्ट्रवादीकडून बैलगाड्या-ट्रॅक्टर मोर्चा

कारवाईच्या आकडेवारीचा तक्ता
(19जून ते 03जुलैपर्यंतची आकडेवारी)
नौपाडा-कोपरी – 10
दिवा – 28
मुंब्रा – 15
कळवा – 12
उथळसर – 11
माजिवडा-मानपाडा – 20
वर्तक नगर -14
लोकमान्य नगर -10
वागळे इस्टेट – 04
एकूण – 124

 

Web Title: Thane news 124 unauthorized constructions in manpahadi major action by anti encroachment squad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 02:17 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • Thane news
  • Unauthorized buildings

संबंधित बातम्या

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख
1

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ
2

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस
3

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस

SIR Voter List: मतदारांनो, नाव तपासा! SIR ची प्रारूप यादी प्रसिद्ध, नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन
4

SIR Voter List: मतदारांनो, नाव तपासा! SIR ची प्रारूप यादी प्रसिद्ध, नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.