लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवरुन सरकारला घेरले आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maharashtra Farmer Sucide : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी जोरदार राजकारण रंगले आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर कोणतीही कर्जमाफी न दिल्यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदशनशील असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सरकार कर्जमाफी देत नाही त्यामध्ये अवकाळी पावसाने राज्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याची आकडेवारी समोर आणून लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
राज्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असल्याचे चित्र आहे. कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशामध्ये प्रगतशील अशा महाराष्ट्रामध्ये बळीराजाला मात्र आपला जीव गमवावा लागतो आहे. मागील तीन महिन्यांमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी समोर आली आहे. केवळ तीन महिन्यामध्ये तब्बल 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यावरुन राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विधीमंडळामध्ये देण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीचा हवाला देत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, कल्पना करा… फक्त तीन महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही फक्त एक आकडेवारी आहे का? नाही. ही ७६७ उद्ध्वस्त घरे आहेत. ७६७ कुटुंबे जी कधीही सावरणार नाहीत. आणि सरकार? ते गप्प आहे. ती उदासीनतेने पाहत आहे, अशा शब्दांत राहुल गांधींनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था मांडली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत चालला आहे – बियाणे महाग आहेत, खते महाग आहेत, डिझेल महाग आहे… पण किमान आधारभूत किमतीची हमी नाही. जेव्हा ते कर्जमाफीची मागणी करतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण ज्यांच्याकडे करोडो आहेत? मोदी सरकार त्यांचे कर्ज सहजपणे माफ करते. आजच्या बातम्या पहा – अनिल अंबानींचा ₹४८,००० कोटींचा एसबीआय “फसवणूक”. मोदीजींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे म्हटले होते पण आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांचे आयुष्य निम्मे होत चालले आहे. ही व्यवस्था शेतकऱ्यांना मारत आहे – शांतपणे, पण सतत आणि मोदीजी स्वतःच्या जनसंपर्काचा तमाशा पाहत आहेत, अशा गंभीर शब्दांत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
सोचिए.. सिर्फ 3 महीनों में महाराष्ट्र में 767 किसानों ने आत्महत्या कर ली।
क्या ये सिर्फ एक आंकड़ा है? नहीं। ये 767 उजड़े हुए घर हैं। 767 परिवार जो कभी नहीं संभल पाएंगे।
और सरकार? चुप है। बेरुख़ी से देख रही है।
किसान हर दिन कर्ज़ में और गहराई तक डूब रहा है – बीज महंगे हैं, खाद… pic.twitter.com/uDzFpYoMrG
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 3, 2025