Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल

शहराच्या दळणवळण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवणारी बहुप्रतिक्षित मेट्रो सेवा अखेर 3 एप्रिल रोजी नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 31, 2026 | 03:59 PM
मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल
Follow Us
Follow Us:
  • मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र;
  • Metro Man कोण? मनसेचा थेट सवाल
मिरा-भाईंदर/विजय काते : शहराच्या दळणवळण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवणारी बहुप्रतिक्षित मेट्रो सेवा अखेर 3 एप्रिल रोजी नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. काशिगाव ते दहिसर या मार्गावरील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पार पडणार असून, यामुळे मिरा-भाईंदरकरांच्या प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उद्घाटना आधीच शहरात श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले असून, विविध राजकीय पक्षांमध्ये ‘मेट्रो मॅन’ कोण यावरून वाद निर्माण झाला आहे.

शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. भाजपाकडून आमदार नरेंद्र मेहता यांना ‘मेट्रो मॅन’ म्हणून दर्शवणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये मेट्रो प्रकल्पासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे ‘मेट्रो मॅन’ म्हणून मोठ्या प्रमाणावर बॅनर्स झळकत आहेत. सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो प्रकल्पाला गती मिळाल्याचा दावा शिवसेनेच्या बॅनर्समधून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेने दोन्ही पक्षांवर जोरदार टीका करत श्रेयवादाच्या राजकारणाला विरोध दर्शवला आहे. “मेट्रो प्रकल्प हा अनेक वर्षांच्या नियोजन, प्रशासनिक प्रक्रिया आणि करदात्यांच्या पैशातून साकार झालेला आहे. त्यामुळे एका व्यक्तीला ‘मेट्रो मॅन’ म्हणून प्रोजेक्ट करणे चुकीचे आहे,” असे मनसेने स्पष्ट केले. तसेच “नेमका मेट्रोचा खरा शिल्पकार कोण?” असा थेट सवाल उपस्थित करत मनसेने या मुद्द्यावर जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे म्हटले आहे.

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला? अर्थसंकल्पीय महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी; भाजपवर टीका

राजकीय पक्षांमधील या स्पर्धेमुळे मेट्रो प्रकल्पाच्या मूळ उद्दिष्टावर पाणी फेरले जात असल्याची भावना काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरातील प्रवाशांना दररोज भेडसावणारी वाहतूक कोंडी, गर्दी आणि वेळेचा अपव्यय यावर उपाय म्हणून मेट्रोकडे आशेने पाहिले जात आहे. मात्र, उद्घाटनाआधीच श्रेयासाठी सुरू झालेल्या या राजकारणामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरणही दिसून येत आहे.

तज्ञांच्या मते, काशिगाव ते दहिसर हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा फायदा होणार आहे. विशेषतः पश्चिम रेल्वेवरील ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, भविष्यातील टप्प्यांमध्ये मेट्रो जाळे विस्तारल्यास मिरा-भाईंदर शहराचा एकूणच विकास वेगाने होण्याची अपेक्षा आहे.दरम्यान, प्रशासनाकडून उद्घाटनाच्या तयारीला अंतिम टप्पा गाठला असून सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि प्रवासी सुविधांबाबत विशेष नियोजन करण्यात आले आहे. मेट्रोच्या प्रत्यक्ष सेवेला सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो, तसेच ती शहरातील वाहतूक समस्यांवर कितपत परिणामकारक ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एकीकडे मेट्रोमुळे विकासाचा मार्ग मोकळा होत असताना, दुसरीकडे श्रेयवादाच्या राजकारणामुळे निर्माण झालेला वाद आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘मेट्रो मॅन’च्या दाव्यांपेक्षा प्रत्यक्षात नागरिकांना मिळणारी सेवा किती प्रभावी ठरते, हेच खरे मोजमाप ठरणार आहे.

महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मुख्यमंत्र्यांसह पोलिस आयुक्तांकडे मागणी; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Web Title: The battle of creditworthiness intensifies before the inauguration of mira bhayander metro who is metro man mnss direct question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • BJP
  • Metro
  • mira bhayandar
  • Mumbai
  • shivsena

संबंधित बातम्या

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…
1

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…

‘रोजच्या शिवीगाळीने महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक’, संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करत महिला सेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन
2

‘रोजच्या शिवीगाळीने महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक’, संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करत महिला सेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

‘गद्दारांना गद्दारचं म्हणणार, पत्रकारांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा’; संजय दिना पाटील प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप
3

‘गद्दारांना गद्दारचं म्हणणार, पत्रकारांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा’; संजय दिना पाटील प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप

Mira Jagannath : जिंकलस गं पोरी! ‘स्वप्न महाग नसतात, जिद्द अपुरी असते’ अभिनेत्रीचं नवं घर अन् नव्या घराची वास्तुशांती!
4

Mira Jagannath : जिंकलस गं पोरी! ‘स्वप्न महाग नसतात, जिद्द अपुरी असते’ अभिनेत्रीचं नवं घर अन् नव्या घराची वास्तुशांती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.