कल्याण : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या पाच दिवसांपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका पाटील यांनी घेतली. याच दरम्यान त्यांनी वैद्यकीय उपचार देखील नाकारलेत. सलग पाच दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालवली आहे.
सरकार या संदर्भात काय निर्णय घेते याकडे तर सर्वांचच लक्ष लागलेय. तर याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घेऊन जरांगे च्या तब्येतीची दखल घेणं गरजेचं असल्याचे सांगितले. तसेच कोण चुक व कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल परंतु सरकारने कोणाच्याही जीवाशी खेळू नये अशी मागणी देखील मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलीय