कल्याण : कल्याण जवळ (Kalyan) असलेल्या मोहने (Mohane) परिसरातील शिवसृष्टी कॉम्प्लेक्समध्ये (Shiv Srishti Complex) काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित (Power Cut) झाला त्यानंतर काही क्षणातच या इमारती मधील काही नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, एसी, पंख्यामधून धूर येऊ लागला. इलेक्ट्रिक उपकरणामधून अचानक धूर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अचानक आलेल्या ओवर होल्टेजमुळे (Over Voltage) हा प्रकार घडला.
[read_also content=”गाझियाबादमध्ये 8 वर्षांपासून AC मेकॅनिक छापत होता बनावट नोटा, ‘एवढ्या’ कोटी रुपयांच्या नोटा छापण्याची केली होती तयारी, वाचाल तर चक्रावून जाल https://www.navarashtra.com/crime/delhi-crime-fake-notes-printing-in-ghaziabad-by-ac-mechanic-for-8-years-preparing-to-print-currency-worth-5-crores-nrvb-399311.html”]
या भागाला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये (Transformar) तांत्रिक बिघाड (Technical Fault) झाल्याने याचा फटका ग्राहकांना बसला. या घटनेत नागरिकांचे टीव्ही, फ्रिज, एसीसह चार्जिंग लावलेले मोबाईल देखील खराब झालेत. महावितरणची याप्रकरणी चूक असून महावितरणाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 14 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-14-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
याबाबत महावितरणचे अधिकारी विजय मोरे यांच्या संपर्क साधला असता या भागातील ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा प्रकार घडलाय, संबधित इमारतीला पर्यायी व्यवस्था करत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलाय तर ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू आहे. झालेल्या नुकसानीबाबत संबंधितांचे अर्ज आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.