Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कासच्या बारामाही पर्यटनाचे वन विभागाकडून तीनतेरा? अधिकारी बदलले की नियमही बदलतात

कास पठारावर बारमाही पर्यटन चालू राहावे म्हणून तात्कालीन उपवनसंरक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी जवळजवळ 25 लाख रुपये खर्च करून महिंद्रा गाड्या खरेदी करण्यात आल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 10, 2026 | 09:32 AM
कासच्या बारामाही पर्यटनाचे वन विभागाकडून तीनतेरा? अधिकारी बदलले की नियमही बदलतात

कासच्या बारामाही पर्यटनाचे वन विभागाकडून तीनतेरा? अधिकारी बदलले की नियमही बदलतात

Follow Us
Close
Follow Us:

कास पठार : जागतिक वारसास्थळ असलेले आणि सातारा जिल्ह्याचे भूषण असलेले कास पठार. या कास पठारामुळे सातारा जावली तालुक्यात पर्यटनाला चालना मिळाली. लाखो पर्यटकांची पावले कासच्या दिशेने वळू लागली. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये असणारी रंगीबेरंगी फुलांची पर्वणी संपल्यानंतर कासचा अद्भूत निसर्ग पाहण्यासाठी कास पठारावर बारमाही पर्यटन सुरू राहावे, यासाठी कास पठार समिती असेल किंवा स्थानिक ग्रामस्थ प्रयत्नशील आहे.

कासला बारामाही पर्यटन सुरू राहून स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून कास पठार कार्यकारी समितीच्या पुढाकाराने व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून सुरू असलेले बारमाही पर्यटनाचे वन विभागाच्या अधिकाऱ्याने तीन तेरा वाजवले असून, पर्यटनासाठी घेतलेली वाहने कास पठारावर किंवा वनविभागाच्या ऑफिसमध्ये धूळखात पडली. यामुळे वन कमिटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.

कास पठारावर बारमाही पर्यटन चालू राहावे म्हणून तात्कालीन उपवनसंरक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी जवळजवळ 25 लाख रुपये खर्च करून महिंद्रा गाड्या खरेदी करण्यात आल्या. त्या वेळेपासून कास पठारावर जीप सफारी व इतर पर्यटन सुरू होते. त्यामुळे कास पठार परिसरातील स्थानिक सहा गावातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला होता. परंतु, अधिकारी बदलले की कास पठारावर नियम बदलत असतात. मोहितेंची बदली झाली की लगेच नवीन अधिकाऱ्यांनी नवीन नियम सुरू केले. तर नंतर काही दिवसांनी हंगाम कालावधी वगळता इतर महिन्यातील पर्यटनच बंद झाले आणि त्याच्यावर भरीस भर म्हणजे 2025 च्या हंगाम कालावधीत अगोदरच्या गाड्या धुळ खात पडल्या.

स्थानिक ग्रामस्थांची सभा न घेता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कास समितीच्या पैशातून चार इलेक्ट्रिकल वाहने विकत घेतली. अगोदरच नगरपालिकेने दिलेले एक इलेक्ट्रिक वाहन कास पठारावर बंद असताना नवीन चार गाड्या खरेदी करण्याचे गौडबंगाल काय? याबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये संभ्रमवस्था आहे. यासाठी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची सभा घेणे गरजेचे असताना सुद्धा स्वतः मनमानी पद्धतीने इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली आहेत आणि ती वाहने सध्या बंद अवस्थेत असून कास पठारावर धूळ खात पडून आहेत.

हेदेखील वाचा : ‘लाडक्या बहिणी’मुळे अन्य खात्यांवर येतोय आर्थिक ताण; आता योजना बंद होणार का? मंत्री नाईक म्हणाले…

Web Title: The issue of tourism in the kaas plateau is becoming serious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Kas Pathar
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News:  शेतकऱ्यांसाठी दिलासा! खरीप हंगामासाठी खतांचा मुबलक साठा उपलब्ध
1

Satara News: शेतकऱ्यांसाठी दिलासा! खरीप हंगामासाठी खतांचा मुबलक साठा उपलब्ध

साताऱ्यात एनसीईआरटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; वृषालीराजे भोसलेंनी केलं मोर्चाचे नेतृत्त्व
2

साताऱ्यात एनसीईआरटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; वृषालीराजे भोसलेंनी केलं मोर्चाचे नेतृत्त्व

म्हसवड पालिकेचा अजब कारभार; व्यापारी गाळे विनाभाडे, लिलाव मात्र रखडले
3

म्हसवड पालिकेचा अजब कारभार; व्यापारी गाळे विनाभाडे, लिलाव मात्र रखडले

भक्तीच्या महापुरात न्हाली मोहोळ नगरी; गुरू-शिष्य भेट अन् खर्गे महाराजांकडून ‘ही’ भाकणूक
4

भक्तीच्या महापुरात न्हाली मोहोळ नगरी; गुरू-शिष्य भेट अन् खर्गे महाराजांकडून ‘ही’ भाकणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.