देवरी : देवरी तालुक्यातील मुल्ला (Mulla of Deori Taluka) येथील तलाव फुटून शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली (Farmland under water) आल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी घटली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
८ ऑगस्टला सायंकाळ पासून सतत येत असलेल्या पावसाने मुल्ला येथील तलावातील पाण्याची पातळी वाढली. जेमतेम रोवणीची कामे आटोपली होती. त्यातच सतत पाण्याचा साठा वाढत असल्याने पाळ फुटली. परिणामी परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली (Hundreds acres agriculture under water) गेली आहे.
आधीच सतत येत असलेल्या पावसामुळे रोवणी उशीरा झाली. रोवणी झालेल्या शेतात पाणी भरल्यामुळे धान सडण्याची शक्यता आहे. काही धान पाण्यासोबत वाहून गेले. नुकसानामुळे (due to damage) शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न (Livelihood issue before farmers) निर्माण झाला आहे. महसूल विभागाने सर्वेक्षण (Survey by Revenue Department) करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.