आश्रमशाळेतील २ शिक्षक निलंबित
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी अंतर्गत येणाऱ्या लोहारा शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून दोन शिक्षकांवर मूलचेरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला. आरोपींना मंगळवारी (दि. १०) न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
शासकीय आश्रमशाळा लोहारा येथील पदवीधर शिक्षक संदीप शिवाजी फड आणि माध्यमिक सुभाष खुशब लांडे यांच्याविरुद्ध येथील २४ विद्यार्थिनींनी शाळेतील अधीक्षकांकडे शनिवारी ‘बॅड टच’ आणि मारहाणीबाबत तक्रार दिली होती. संबंधित अधीक्षकाने येथील मुख्याध्यापक पुरी यांच्याकडे तक्रार देताच या गंभीर बाबींची दखल घेऊन मुख्याध्यापकांनी रविवारी (दि. ८) अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांना या घटनेची माहिती दिली. प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुहास वसावे आणि सहाय्यक प्रकल्प एस. पी. डोंगरे यांना संबंधित शाळेत चौकशीसाठी पाठविले.
यानंतर लोहारा शासकीय आश्रमशाळेतील तब्बल ८८ घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत अंतिम गुन्हा निष्पन्न होताच संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
24 विद्यार्थिनींची ‘बॅड टच’ आणि मारहाणीबाबत तक्रार
24 विद्यार्थिनींना सोमवारी मुलचेरा ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पदवीधर शिक्षक संदीप फड यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि मारहाणीचा तर लांडे याच्यावर अॅट्रॉसिटी आणि पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
फड आणि लांडे हे इंग्रजी माध्यमिक शाळा गडचिरोली येथून याच शैक्षणिक सत्रात लोहारा शासकीय आश्रमशाळेत रुजू झाले होते. नुकतेच भामरागड प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने येथील विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. या घटनेचे गांभीर्य पाहून येथील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता अहेरी प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या लोहारा आश्रमशाळेतील दोन शिक्षकांवर येथील विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हेदेखील वाचा : वर्गातच थरार! लॉ स्टुडंटने आधी विद्यार्थिनीवर झाडली गोळी, नंतर ३ सेकंदात स्वतःलाही संपवलं; अंगावर शहारे आणणारा Video समोर






