मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Maharashtra Rain) धुमाकूळ घातला आहे. जूनच्या अखेर व जुलै (June and July) महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जोरदार बॅटिग केली आहे, त्यामुळं बळीराजा सुखावला आहे, तसेच शेतीसाठी लागणारे पाणी (Water) सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे, तसेच या महिन्यात पडलेल्या प्रचंड पावसामुळं नदी, नाले, तलाव, धरण (Lake, dam) यांच्यात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. तर काही धरणात शंभर टक्के पाणी भरले आहे. राज्यातील सर्वंच भागात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावत ज्यावेळी शेतील गरज होती तेव्हा पाऊस बरसला. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आदी भागात पाऊस समाधानकारक पडला आहे. (Mumbai, Konkan, West Maharashtra, North Maharashtra, Vidarbha, Marathwada rain)
[read_also content=”विवाहित पुरुष ‘का’ करतात फ्लर्ट? जाणून घ्या… https://www.navarashtra.com/lifestyle/why-do-married-men-flirt-after-marriage-men-love-nrrd-307842.html”]
दरम्यान, मागील आठवड्यापासून मुंबईसह, कोकण, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आदी भागात सध्या पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळं बळीराजाला दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे जुलैमधील पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यभरात पावसानं धुमशान घातलं आहे. अनेक गावा-खेड्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली असून खेड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे. एवढंच नाहीतर मुसळधार पावसानं (Maharashtra Rain) बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बसला असून तेथील 2 लाख 97 हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, फळपिकांचं नुकसान झालं आहे. विदर्भात जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली आहेत. वर्धा, नागपूर, गडचिरोलीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
पावसामुळं नुकसान झालेल्यांचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. तसेच, बळीराजाला राग आला तर लोकप्रतिनिधींना शेतकरी रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. त्यामुळे नुकसानाचे पंचनामे कधी होणार, मायबाप सरकार मदत कधी करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.