Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळग्रस्त भागात महसूल विभागाने करवसुली तात्काळ थांबवावी; विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी

दुष्काळग्रस्त भागात महसूल विभागाने करवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2024 | 08:33 AM
दुष्काळग्रस्त भागात महसूल विभागाने करवसुली तात्काळ थांबवावी; विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये महसूल विभागाकडून करवसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सरकार एकीकडे दावोसवर 34 कोटींची उधळण करत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून वसुली सुरु आहे. यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागात महसूल विभागाने करवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, लेखी आदेश वेगळे आणि तोंडी आदेश वेगळे असा खेळ या सरकारने मांडला आहे. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. दुष्काळग्रस्त भागात सरकारी वसुली, वीजबिल वसुली, कर्जवसुलीला बंदी आहे. तरीही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून वसुली सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत तुटपुंज्या सवलती आहेत. तरीही महसूल वसुली, कर्जवसुलीचा तगादा लावला जात आहे. अशा संवेदना गमावलेल्या सरकारला शेतकऱ्यांनी जागा दाखवावी.

नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गाव पातळीवर तलाठ्याकडून करांची वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय अन्य दुष्काळी उपाययोजनांकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. महसूलमंत्र्याच्या जिल्ह्यात महसूल कराची वसुली होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. सरकारने शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये. शेतकऱ्यांकडून वसुली करू नये. दावोसवर उधळपट्टी करताना शेतकऱ्यांचा विचार करावा, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे कान उपटले आहेत.

Web Title: The revenue department should immediately stop tax collection in drought affected areas vijay wadettiwars demand to govt nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2024 | 08:33 AM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • Congress
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आमचा आवाज दाबण्यासाठी…”; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
1

Maharashtra Politics: “आमचा आवाज दाबण्यासाठी…”; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

Dharashiv Politics: धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकीय रणकंदन! भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची बॅनरबाजी, शहराच्या विकासाला ‘ब्रेक’
2

Dharashiv Politics: धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकीय रणकंदन! भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची बॅनरबाजी, शहराच्या विकासाला ‘ब्रेक’

Nashik News: ३ लाख अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत, ९ दिवसात केवळ ७८ कोटी रुपये वितरित
3

Nashik News: ३ लाख अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत, ९ दिवसात केवळ ७८ कोटी रुपये वितरित

जालन्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढली! ‘या’ नेत्यांनी सपकाळांच्या उपस्थितीत केला प्रवेश
4

जालन्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढली! ‘या’ नेत्यांनी सपकाळांच्या उपस्थितीत केला प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.