Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde : कोल्हापूरमध्ये महायुतीचा भगवा नक्कीच फडकेल, श्रीकांत शिंदे यांचा विश्वास

महाराष्ट्रात इतकं मोठं यश कधीच मिळालं नाही तेवढं महायुतीला मिळालं आहे. मुख्यमंत्री असताना जे काम अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांनी केलं, तरुण, महिला, गरजू यांच्यासाठी काम केलं,अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 26, 2025 | 06:14 PM
कोल्हापूरमध्ये महायुतीचा भगवा नक्कीच फडकेल, श्रीकांत शिंदे यांचा विश्वास

कोल्हापूरमध्ये महायुतीचा भगवा नक्कीच फडकेल, श्रीकांत शिंदे यांचा विश्वास

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकडे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारीक लक्ष आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुती सरकारने कोल्हापूरच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला. यापुढेही कोल्हापूरला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करु, अशी ग्वाही शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. शिवसेना पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते शनिवारी झाले.

महिलांना मारहाण अन् दारूच्या नशेत…; महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रातील महिला असुरक्षित

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, कोल्हापूरकरांनी शिवसेनेला भरभरुन प्रेम केले. इथल्या मतदारांनी महायुतीच्या १० पैकी १० जागा निवडून दिल्या. यात शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले. या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडवता येतील. जिल्ह्यात मध्यवर्ती कार्यालय असावे अशी बऱ्याच वर्षांपासून कार्यकर्त्यांची मागणी होती. आज मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून ती पूर्ण झाली, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी अडीच वर्ष राज्याचे नेतृत्व करताना महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांच्यासाठी अनेक निर्णय घेतले. लाडकी बहिण योजना आणली. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे निर्णय घेतले. अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा या महाराष्ट्राने पाहिला. या कामामुळेच सर्वसामान्यांचा विश्वास शिंदे साहेबांवर आणि शिवसेनेवर बसला, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. जेष्ठ नागरिकांना एसटीमध्ये मोफत प्रवासाची सवलत योजना लागू केली. सुरुवातीला या योजनेची खिल्ली उडवली गेली, मात्र या योजनेचा लाखो ज्येष्ठांनी लाभ घेतला.

याबाबत पन्हाळा ते पावनखिंड या मोहीमे दरम्यान आपल्याला अनुभव आल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. या मोहीमेच्या वाटेवर एक ज्येष्ठ नागरिक वाट पाहत होते. ते मला भेटले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देण्याची भावना व्यक्त केली. तळागाळातील लोकांसाठी शिंदे साहेबांनी केलेल्या कामाचा आपल्याला अनुभव येतो, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. काहीजण सकाळ संध्याकाळ टोमणे मारण्याचे, शिव्या देण्याचे काम करतात, पण त्यांना मतदारांनी घरी बसवले असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठाला लगावला.

जिल्ह्यात पाऊस असून देखील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत. शिवसेना हा विचार आहे. तो पुढे घेऊन जात असताना तो ऊन वारा पाऊस कशाचीही तमा बाळगत नाही हे आज पुन्हा एकदा दिसून आले, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक ही मोहीम सुरु आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी सुरु करा. लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करायचे आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभ राहायचं आहे. जिल्ह्यात महायुतीचा भगवा नक्कीच फडकेल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

वसई-विरार महानगरपालिकेचा अजब कारभार, स्मशानभूमीत बालउद्यानाची निर्मिती, नागरिकांमध्ये संतापाची लाट

Web Title: The saffron of the mahayuti will definitely flourish in kolhapur believes shrikant shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Political
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा
1

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
2

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न
3

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न

Eknath Shinde: शेतापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत महाराष्ट्राचा वस्त्रोद्योग; ‘फार्म टू फॉरेन’ उपक्रमाला चालना
4

Eknath Shinde: शेतापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत महाराष्ट्राचा वस्त्रोद्योग; ‘फार्म टू फॉरेन’ उपक्रमाला चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.