Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

MSRTC Ganpati special Buses: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. गणपती उत्सवासाठी करण्यात येणाऱ्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2026 | 04:12 PM
गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

Follow Us
Follow Us:
  • गणपती उत्सवाच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाचा निर्णय
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले, “गणपती उत्सव, मुंबई-ठाण्यातील कोकणवासी आणि एसटी यांचे अतूट नाते आहे. मुंबई, ठाणे येथील आपल्या घरापासून कोकणातील वाड्या-वस्त्यांपर्यंत एसटी बसद्वारे थेट जाता येत असल्याने कोकणवासी नेहमीच एसटीला प्राधान्य देत आले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सरासरी ५ हजार बसेस आरक्षित केल्या जातात.”

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी

यंदा एसटी महामंडळाचा वाढता तोटा कमी करण्यासाठी नाईलाजास्तव एकेरी गट आरक्षणावर ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयामुळे अनेक कोकणवासीय तसेच गणेशभक्त मंडळांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन आणि निवेदनांद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी केली होती.

कोकणवासीयांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले. त्यानुसार कोकणवासीयांच्या भावनांचा आदर करून यंदा एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात येत आहे. याबाबतचे परिपत्रक लवकरच एसटी प्रशासनाकडून जारी करण्यात येईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

वाढत्या तोट्यामुळे नाईलाजास्तव ३० टक्के अतिरिक्त शुल्क

दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून सुमारे ५ हजारांहून अधिक बसेस एसटी महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जातात. या विशेष वाहतुकीसाठी राज्यातील इतर विभागांतून दोन-तीन दिवस आधी बसेस मागविल्या जातात.

एकेरी गट आरक्षणामुळे कोकणात प्रवाशांना सोडल्यानंतर या बसेस रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे एसटी महामंडळावर इंधनाचा खर्च तसेच चालक-वाहकांच्या अतिकालीन भत्त्याचा अतिरिक्त भार पडतो. त्यातच डिझेलच्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात वाढ झाल्याने एसटीच्या तोट्यात मोठी वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून एसटी महामंडळाने यंदापासून एकेरी गट आरक्षणावर ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, एका कुटुंबात ३०% अतिरिक्त शुल्क हे पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांला लागू होते. अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना १५% भार सहन करावा लागला असता. सध्या खासगी वाहतूकदारांनी वाढलेली तिकीट दर वाढ लक्षात घेता ही अतिरिक्त शुल्क वाढ किफायतशीर होती.

मात्र, कोकणवासीयांच्या भावना आणि मागणी लक्षात घेऊन हे शुल्क आता रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला होणारा संभाव्य आर्थिक तोटा इतर मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढावा, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी

Web Title: Msrtc cancels 30 percent extra charge single group reservation ganpati festival eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ganpati Festival
  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
1

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
2

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
3

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
4

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.