फोटो सौजन्य:
नवी मुंबई : महापालिकेचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाआहे. महापालिकेने बेघरांसाठी शहरात उभारलेलल्या निवारा केंद्रातून महिलाच असुरक्षित असल्याच्या गंभीर प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ सुरु झाली आहे. नवी मुंबईतील घणसोली सेक्टर ४ मध्ये उभारण्यात आलेल्या बेघर निवारा केंद्रातील महिलांवर केंद्र चालकांकडून अत्याचार होत असल्याचा गंभीर बेघर महिलेने केला आहे. रात्री बेरात्री कर्मचारी दारू पिऊन तेथील तरुण महिलांवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांना मारझोड केली जात असल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे. अनेक बेघर आजारपणाने बेजार झाले असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्यांना कोंडून ठेवण्यात आलं.
दारूच्या नशेत पुरुष महिलांच्या शेजारी जबरदस्तीने झोपलेले व्हिडिओ वायरल करून या बेघर महिलेने वारंवार महापालिका अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. मात्र नवी मुंबईचे महापालिकेचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक करत आहेत. करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले हे बेघर निवारा केंद्रांना महापालिका अधिकाऱ्यांनी महापालिकेपासून बेघर करून टाकलेत.. या केंद्रात सुरू असलेला सर्व धक्कादायक प्रकार एका महिलेने कॅमेरात कैद करून पालिकेच्या निष्काळजीपणाचं पितळ उघडं पाडलं आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या बेघर नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रातील महिलांची सुरक्षा धोक्यात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या केंद्रांमध्ये राहणाऱ्या महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यात विशेषतः सुरक्षिततेचा प्रश्न अधिकाअधिक संवेदनशील आणि गंभीर होत चालला आहे.
महापालिकेने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून बेघर लोकांसाठी निवारा केंद्रांची उभारणी केली आहे. मात्र या केंद्रांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था नाही. बहुतांश ठिकाणी महिला आणि पुरुषांची वस्ती एकत्रित असून त्यामुळे महिलांना असुरक्षिततेची भावना सतत सतावत असते.रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षकांची अनुपस्थिती, खराब स्वच्छता व्यवस्था, आणि संरक्षणाचा अभाव या गोष्टी महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्याचबरोबर काही महिलांनी लैंगिक छळाची भीती व्यक्त केली आहे, मात्र तक्रार केली तर वसतीतून बेघर होण्याची भिती त्यांना सतावत आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी या प्रकरणावर महापालिकेचे लक्ष वेधले असून, महिलांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र, २४ तास महिला सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही व्यवस्था, आणि सल्लामसलत सेवा पुरवण्याची मागणी केली आहे.महापालिकेच्या निवारा केंद्रांची उद्दिष्टे जरी चांगली असली, तरी अंमलबजावणीतील दुर्लक्ष आणि महिला सुरक्षिततेचा अभाव ही गंभीर समस्या ठरू शकते. त्यामुळे महापालिकेने त्वरित सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या घटनेमुळे बेघर महिलांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक झाले आहे.