Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारचा दिव्यांगांसाठी मोठा निर्णय; खात्यात जमा होणार तब्बल…

दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने अखेर ३९ वर्षांनंतर टूलकिट अनुदान योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 15, 2026 | 03:06 PM
राज्य सरकारचा दिव्यांगांसाठी मोठा निर्णय; खात्यात जमा होणार तब्बल...

राज्य सरकारचा दिव्यांगांसाठी मोठा निर्णय; खात्यात जमा होणार तब्बल...

Follow Us
Follow Us:

पुणे : दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने अखेर ३९ वर्षांनंतर टूलकिट अनुदान योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत केवळ एक हजार रुपयांवर मर्यादित असलेले साधनसामग्री खरेदीचे अर्थसाहाय्य आता थेट १५ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर शासनाने प्रतिसाद दिला आहे.

 

१९८७ पासून लागू असलेल्या या योजनेत अनेक वर्षे कोणताही बदल करण्यात आला नव्हता. त्यामुळे दिव्यांग प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगारासाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरत होते. या पार्श्वभूमीवर योजनेत सुधारणा करत पात्र प्रशिक्षित दिव्यांगांना त्यांच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या टूलकिट खरेदीसाठी कमाल १५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गांसाठी लागू राहणार असून अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य संस्था किंवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांगांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विशेषतः प्रशिक्षित दिव्यांग महिलांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दिव्यांगांमध्ये रोजगाराभिमुख शिक्षणाची कमतरता, शारीरिक-मानसिक मर्यादा, आर्थिक पाठबळाचा अभाव तसेच उद्योग क्षेत्रातील मर्यादित संधी यामुळे नोकरी मिळवणे किंवा टिकवणे अनेकांना अवघड जाते. अनेकांनी आयटीआय किंवा तत्सम संस्थांतून कौशल्य प्रशिक्षण घेतले असले तरी रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने ते आर्थिकदृष्ट्या मागे राहतात. अशा परिस्थितीत स्वयंरोजगारासाठी आवश्यक साधनसामग्री खरेदीसाठी शासनाचे हे अर्थसाहाय्य महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, दिव्यांग कल्याण विभागाच्या अन्य योजनांमध्येही काळानुरूप सुधारणा करण्याची मागणी पुढे येत आहे. कृत्रिम अवयव, बीजभांडवल आणि शिष्यवृत्ती योजनांमध्येही वाढ व बदल अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा : दौंड तालुक्यात एकाच दिवशी तीन विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांसमोर शोध मोहीमेचे मोठं आव्हान

जिल्हास्तरावर निवड समिती

योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास, उद्योजकता व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांचा समावेश असेल. दिव्यांग कल्याण विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून ती आयुक्त, दिव्यांग कल्याण यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाणार आहे. मात्र अनुदान घेतल्यानंतर व्यवसाय सुरू न केल्यास रक्कम वसूल करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

Web Title: The state government has taken a big decision for the disabled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी
1

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
2

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?
3

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू
4

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.