महापािलकेत मनसे विरुद्ध अायुक्त(File Photo : Pune Municipal) Corporation
पुणे : पुणे महानगरपालिकेचा विस्तार होऊन यापूर्वी अनेक गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. त्यानंतर आता फुरसुंगी आणि उरूळी देवाची ही गावे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्यात आली आहेत. दोन्ही गावांची आता नगरपरिषद स्थापन केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने अधिसूचनाही जारी केली आहे.
हेदेखील वाचा : Mercedes कारच्या नावामागची कथा तुम्हाला माहिती आहे का? ‘या’ मुलीचे नाव ठरले कंपनीसाठी वरदान
उरूळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या दोन्ही गावांची आता नगरपरिषद स्थापन होणार आहे. या दोन्ही गावांकडून अनेकवेळा याबाबींचा विरोध दर्शवण्यात आला होता. यासाठी गावकऱ्यांनीही आंदोलन देखील केली. मात्र, आता राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यात या दोन्ही गावांचा उल्लेख नगर परिषद म्हणून करण्यात यावा, असं म्हटलं आहे. याबाबत आता स्थानिक नागरिक काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये म्हटले की, ‘महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ यांच्या कलम ३ चे पोट-कलम (३) चे खंड (अ) मध्ये प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक अ-मध्ये उपविभाग येथे शासन उद्घोषणा क्रमांक पीएमसी-२०२२/प्र.क्र.४६८/नवि-२२, दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजी प्रसिध्द केली असून महाराष्ट्र शासनाने पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार करण्याचा आणि वगळलेल्या क्षेत्रासाठी नगरपरिषद स्थापन करण्याचा आपला इरादा जाहीर केला होता.
अधिसूचनेच्या अनुषंगाने त्यामध्ये नमुद कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे. भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३ थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेता पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार करणे क्रमप्राप्त आहे.