Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: जि.प.त अवतरणार जिजाऊंसह बाल शिवबा! पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले अनावरण

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्रशासन विशेष उपक्रम राबवत आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारी जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे अनावरण गुरुवारी होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 19, 2026 | 09:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्रशासनाकडून विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारी जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे अनावरण गुरुवारी करण्यात येणार आहे. या सोहळ्याला पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

यापूर्वी या ठिकाणी जिजाबाई यांची प्रतिमा स्थापित करण्यात आली होती. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या संकल्पनेतून जिजाऊ व बाल शिवबा यांचे भव्य शिल्प उभारण्यात आले असून, शिवजयंतीच्या औचित्यावर त्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमाला सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर, विधान परिषद सदस्य किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे तसेच आमदार चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, संजय गायकवाड, श्वेता महाले, सिद्धार्थ खरात आणि मनोज कार्यदे यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलिस अधीक्षक निलेश तांबे आदी वरिष्ठ अधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरे यांना तगडा झटका! शिंदेंच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय 

शिल्प अनावरणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून, शाहीर विक्रांतसिंग राजपूत यांचा शाहिरी जागर हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमातून ऐतिहासिक वारशाचे जतन करत नव्या पिढीमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

Web Title: The zilla parishad administration is implementing special activities on the occasion of the birth anniversary of chhatrapati shivaji maharaj the founder of hindavi swarajya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • Washim
  • Washim news

संबंधित बातम्या

वाशिमच्या सामूहिक कॉपी प्रकरणात २६ शिक्षकांचा समावेश? गुन्हा करण्यात आला दाखल
1

वाशिमच्या सामूहिक कॉपी प्रकरणात २६ शिक्षकांचा समावेश? गुन्हा करण्यात आला दाखल

Washim News : रस्त्यावरील अवजड वाहतक तातडीने थांबवा! अकोली गावकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन
2

Washim News : रस्त्यावरील अवजड वाहतक तातडीने थांबवा! अकोली गावकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन

वाशिममध्ये बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरमध्ये सामूहिक कॉपी! तब्बल ५८१ विद्यार्थ्यांची एकसारखी उत्तरे
3

वाशिममध्ये बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरमध्ये सामूहिक कॉपी! तब्बल ५८१ विद्यार्थ्यांची एकसारखी उत्तरे

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश
4

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.