Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानोऱ्यात हागणदारीमुक्तीचा बोजवारा! उघड्यावर जाण्याचे प्रकार; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मानोरा तालुक्यात हागणदारीमुक्त मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दींमध्ये आजही ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 28, 2026 | 09:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मानोरा तालुक्यात हागणदारीमुक्त मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दींमध्ये आजही ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.

Buldhana News : गोवंश संरक्षणासाठी सरकारचे कठोर पाऊल! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचे निर्देश

‘मेरा भारत, स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत शासनाने हागणदारीमुक्त मोहिम मोठ्या गाजावाजात राबवली होती. उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार थांबवण्यासाठी शौचालय बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात अनुदानही देण्यात आले. मात्र अनेक लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष शौचालय न बांधता अनुदानाचा लाभ घेतल्याचे प्रकार यापूर्वी समोर आल्याची चर्चा आहे. त्यामुळे शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे बोलले जात आहे.

ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने गावांमध्ये अस्वच्छता आणि दुर्गंधीची समस्या गंभीर बनली आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून जावे लागत असल्याचे चित्र आहे. परिणामी, तालुक्यात आरोग्यविषयक समस्या वाढत असून ग्रामस्थांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. मात्र आता ही मोहीम पूर्णपणे थंडबस्त्यात गेल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी आणि संबंधित विभागांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरून पुन्हा एकदा प्रभावी हागणदारीमुक्त मोहिम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांत हागणदारीमुक्त मोहिमेंतर्गत किती नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, याचाही लेखाजोखा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या मते, केवळ कागदोपत्री मोहीम न राबवता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याची आवश्यकता आहे.

“चित्रपटांपेक्षा माणसांची ‘होप’ बनण्यातच खरे समाधान”- सोनू सूद; मोहोळ तालुक्यातील मसलेचौधरी गाव दत्तक

दरम्यान, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गावागावात स्वच्छता आणि हागणदारीमुक्त मोहिम प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून जोर धरत आहे.

Web Title: Open defecation free initiative in manora in shambles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News : गोवंश संरक्षणासाठी सरकारचे कठोर पाऊल! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचे निर्देश
1

Buldhana News : गोवंश संरक्षणासाठी सरकारचे कठोर पाऊल! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचे निर्देश

बुलढाण्यात पाणीटंचाईवर प्रशासनाचा मोठा निर्णय; ५१ गावांत ५८ विंधन विहिरी आणि १० कुपनलिका मंजूर
2

बुलढाण्यात पाणीटंचाईवर प्रशासनाचा मोठा निर्णय; ५१ गावांत ५८ विंधन विहिरी आणि १० कुपनलिका मंजूर

Buldhana : बुलढाण्यात इंधन टंचाईचं संकट गडद ; दरवाढीनंतरही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा
3

Buldhana : बुलढाण्यात इंधन टंचाईचं संकट गडद ; दरवाढीनंतरही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा

राज्यस्तरीय फायरिंग प्रशिक्षणात बुलढाणा पोलिसांचा दबदबा! विकास तिडके यांनी पटकावली ३ पदके
4

राज्यस्तरीय फायरिंग प्रशिक्षणात बुलढाणा पोलिसांचा दबदबा! विकास तिडके यांनी पटकावली ३ पदके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.