Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : जिल्हयात पेट्रोल डिझेलबाबत नागरिकांना दिलासा ; काय म्हणाले शंभूराज देसाई ?

जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल याचा मुबलक साठा आहे तसेच २०% व्यावसायिक सिलेंडर कोटा घेऊन ८०% कोटा घरगुतीसाठी ठेवावा असे केंद्रशासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 29, 2026 | 02:44 PM
Satara News : जिल्हयात पेट्रोल डिझेलबाबत नागरिकांना दिलासा ; काय म्हणाले शंभूराज देसाई ?
Follow Us
Follow Us:
  • जिल्हयात पेट्रोल डिझेलबाबत नागरिकांना दिलासा ;
  • काय शंभूराज देसाई ?
सातारा : जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल याचा मुबलक साठा आहे तसेच २०% व्यावसायिक सिलेंडर कोटा घेऊन ८०% कोटा घरगुतीसाठी ठेवावा असे केंद्रशासनाचे स्पष्ट निर्देश आहेत जिल्ह्यात कोणतीही टंचाईची परिस्थिती नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही टंचाईच्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी आढावा बैठकीनंतर संवाद साधला.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील इत्यादी उपस्थित होते जिल्ह्यात इंधनटंचाईच्या अफवांमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत नागरिकांना दिलासा दिला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असून कोणतीही टंचाई नसल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये किंवा अनावश्यक साठेबाजी टाळावी, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

Satara News : रस्त्यांची दुरावस्था ठरतेय मृत्यूचं कारण; धुळदेव गावच्या हद्दीत Alto कारचा अपघात

नागरिकांनी गरजेपुरतेच इंधन भरावे
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देसाई म्हणाले, जिल्ह्यात गॅस रिफ्यलिंग प्रक्रिया सुरळीत सुरू आहे आणि पुरवतचात कोणतीही अडचण नाही. काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल क्रेडिटवर न देण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या; मात्र संबंधिताना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले, पेट्रोल पंप चालकांवर कोणतीही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. मात्र, नागरिकांनी गरजेपुरतेच इंधन भरावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. माध्यमांमधील काही बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून साठेबाजीचे प्रकार समोर येत आहेत, अशा अफवांमुळे परिस्थिती बिघडू शकते, त्यामुळे जबाबदारीने वर्तन करावे, असे देसाई यांनी नमूद केले.

अतिक्रमणांवर न्यायालयाचा आदेश मिळताच कारवाई
दरम्यान, पाटण महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणांवर न्यायालयाचा आदेश मिळताच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच, पर्यटनस्थळांसाठी २० टक्के अतिरिक्त इंधन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी कोणताही इंधन साठा धोकादायक पद्धतीने करू नये असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील रॉकेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठीही प्रशासनाने नियोजन केले असून कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी तयारी केली आहे. कराड चिपळूण महामार्गाच्या दुरुस्ती संदर्भात पाटणमधील धांडे लवकरच पाडण्यात येऊन त्याची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे त्यामुळे पाटण कडे जाणारा रस्ता वाहतुकी करता अवजड वाहनानकरिता बंद ठेवण्यात आला आहे असे ते म्हणाले.

Satara News : रस्त्यांची दुरवस्था आणि भरधाव वाहनांचा कहर; भीषण अपघाताने कराड हादरलं

Web Title: There is ample stock of petrol and diesel in the district so shambhuraj desai appeals to citizens not to believe any rumours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक
1

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
2

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा
3

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
4

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.