Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदा गणेशोत्सवात खड्ड्यांचे विघ्न! 7739 खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा

बहुतांश रस्त्यांवर खड्डे असल्याचे चित्र असून, खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. दरम्यान, साडेसात हजारांहून अधिक खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासाकडून करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 14, 2023 | 09:01 AM
यंदा गणेशोत्सवात खड्ड्यांचे विघ्न! 7739 खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा
Follow Us
Follow Us:

पुणे : गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी खड्डे बुजविण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने आणि सार्वजनिक मंडळांनी मंडपासाठी मोठ्या प्रमाणावर खड्डे घेतल्याने गणेशोत्सावात खड्ड्यांचे विघ्न कायम राहणार आहे. त्यामुळे शहरात बहुतांश रस्त्यांवर खड्डे असल्याचे चित्र असून, खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. दरम्यान, साडेसात हजारांहून अधिक खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासाकडून करण्यात आला आहे.

सततच्या रस्ते खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे पुढे आले होते. बहुतांश प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडल्याने महापालिका प्रशासनावर जोरदार टीका झाली होती. रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने एका खासगी संस्थेमार्फत शहरातील रस्त्यांची पाहणी करून घेतली. त्यामध्ये कोणत्या रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे, याचा अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार १०० किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये काँक्रिटच्या ८.३० किलोमीटर रस्त्यांचा समावेश तर उर्वरित ९१ किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.

डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्याची कामे महापालिकेच्या पथ विभागाने सुरू केलीत. मात्र प्रारंभीपासूनच याचा वेग कमी राहिला. त्यातच कामे घाईगडबडीत केल्याने कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याने रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याची वस्तुस्थिती पुढे आली होती. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येतील, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र दहिहंडी आणि गणेशोत्सवासाठी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून मंडप टाकण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावंर पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याची वस्तुस्थिती आहे.

शहरातील अनेक मंडळे प्रमुख रस्त्यांवर आहेत. या मंडळांचे मंडप काही मीटर लांबीचे आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मंडपांच्या खांबांसाठी खड्डे घेण्यात आले आहेत. दरम्यान, उत्सवाच्या काळात पडलेले खड्डे सात दिवसांच्या आत बुजविण्याची जबाबदारी संबंधित मंडळांची असल्याचे महापालिकेने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर खड्डे घेतल्याने रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. खड्डे दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडून यंदा तीनशे कोटींचा खर्च केला जाणार आहे. मात्र हा खर्चही उधळपट्टी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

[blockquote content=”महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत सात हजार ७३९ खड्डे बुजविले आहेत. ३५५ चेंबर्सची दुरुस्ती महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे. खड्डे बुजविण्यासाठी २७ हजार मेट्रिक टन डांबरयुक्त खडी वापरण्यात आली आहे.” pic=”” name=” – साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग”]

Web Title: This years ganeshotsav the problem of potholes the municipal corporation claims to have filled 7739 potholes nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2023 | 09:01 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • ganesh utsav
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
2

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
3

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
4

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.