Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरुळी कांचनमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात, एकाचा जागेवरच मृत्यू ; दोन कंटेनरसह कारचे नुकसान

पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन हद्दीत झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) पहाटे पाचच्या सुमारास घडली. विकास सुरेंद्र (वय-३५, रा. रायपुर, छत्तीसगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. अपघातात दोन कंटेनर व एक चारचाकी अशा तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2023 | 07:40 AM
उरुळी कांचनमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात, एकाचा जागेवरच मृत्यू ; दोन कंटेनरसह कारचे नुकसान
Follow Us
Close
Follow Us:

पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन हद्दीत झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) पहाटे पाचच्या सुमारास घडली. विकास सुरेंद्र (वय-३५, रा. रायपुर, छत्तीसगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. अपघातात दोन कंटेनर व एक चारचाकी अशा तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पुणे – सोलापूर महामार्गावर एलाईट चौक व तळवडी चौक या दोन्ही चौकांच्या मध्ये एका कंटेनरचा बिघाड झाल्याने मध्यरात्री थांबला होता. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास विकास सुरेंद्र हा कंटेनर घेऊन पुण्याच्या बाजूने निघाला असताना अचानकपणे महामार्गावर थांबलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. या धडकेत कंटेनर दुभाजकावरून सोलापूरच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर आला व सोलापूरच्या दिशेने उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीला जाऊन धडकला. यामध्ये चारचाकी गाडीचे व कंटेनरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये कंटेनरचा चालक विकास सुरेंद्र हा निपचित पडल्याचे दिसून आले. कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून विकासला उपचारासाठी उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अर्धा तास अपघातग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

दरम्यान, पाच मिनिटाच्या अंतरावर लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत उरुळी कांचन पोलीस दुरक्षेत्र असूनही पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी अपघात स्थळी न आल्याने तब्बल अर्धा तास या अपघात ग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्यामुळे अपघात झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्तांना पोलिसांकडून तत्काळ मदत मिळाली नसल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Three vehicle freak accident in uruli kanchan one dies on the spot damage to the car with two containers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2023 | 07:40 AM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Urali kanchan

संबंधित बातम्या

Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास
1

Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

राजकारणात भूकंप! ‘या’ राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई; BJP ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार?
2

राजकारणात भूकंप! ‘या’ राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई; BJP ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार?

मोठी बातमी! ‘या’ राज्यात भाजपचे ऑपरेशन Lotus? काँग्रेससाठी 48 तास महत्वाचे; खरगे म्हणाले…
3

मोठी बातमी! ‘या’ राज्यात भाजपचे ऑपरेशन Lotus? काँग्रेससाठी 48 तास महत्वाचे; खरगे म्हणाले…

“या भावनेशी जो नडेल त्याचे…”; संसदेतील ‘या’ नियमावरून ममता बॅनर्जींंचा मोदी सरकारवर टीकास्त्र
4

“या भावनेशी जो नडेल त्याचे…”; संसदेतील ‘या’ नियमावरून ममता बॅनर्जींंचा मोदी सरकारवर टीकास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.