तरुणाच्या 'त्या' धमकीने अल्पवयीन मुलगी झाली भयभीत; विष प्राशन करून संपवलं जीवन (File Photo : Suicide)
मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालवीय गार्डनस्थित एका 42 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
हेदेखील वाचा : MVA: महाविकास आघाडीने मुंबईतील ३६ पैकी ‘इतक्या’ जागांचा तिढा सोडवला? लवकरच जागावाटप जाहीर करणार
पवन गोपालदास बंग (वय 42) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. 29) उघडकीस आली. मूळचे खानापूर येथील रहिवाशी पवन गोपालदास बंग हे मालवीय गार्डन येथे राहत होते. त्यांनी आपल्या शेतात बँकेचे तसेच खाजगी कर्ज घेऊन सोयाबीन कपाशीची पेरणी केली. मात्र, यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत. कपाशीवर सुद्धा रोग आल्यामुळे पीक हातातून निघून गेले. या विवंचनेत पवन बंग हे नेहमीच राहत होते.
दोन महिन्यांपूर्वी वडिलांचेही निधन
दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या सर्व प्रकारची धास्ती घेऊन पवन बंग यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. पहाटे त्यांना उलटी होत असल्याचे पाहून त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे लोकांच्या लक्षात आले.
अमरावती येथील रूग्णालयात दाखल पण…
पवन बंग यांना उलटीचा त्रास सुरू झाल्याने लगेचच त्यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी प्रथमोपचारानंतर त्यांची प्राणज्योत मावळली.