मुंबई- भारतीय संगीतातील एक परिमाण, संगीत क्षेत्राचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या नावांशिवाय तो पूर्ण करता येणार नाही. ज्यांनी विविध भाषात हजारो गाणी गायली. ज्यांची गाणी ऐकत कित्येक पिढ्या मोठ्या झाल्या. अशा महान गायिका स्वरसम्राज्ञी लता दिदि अर्थात लता मंगेशकर यांचा आज प्रथम स्मृतीदिन आहे. मागील वर्षी ६ फेंब्रुवारी २०२२ या दिवशी लता दिदिंनी दिर्घ आजारामुळं अखेरचा श्वास घेतला होता.
संपूर्ण देश हळहळला…
यावेळी संपूर्ण देश हळहळला होता. संगीतावर गारुड घालणारे आणि स्वत:सह करोडो लोकांचे जीवन संगीत आणि गाण्यानं समृद्ध करणाऱ्या लता दिदिंच्या जाण्यानं संगीतातील न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आज दिदिंचा प्रथम स्मृतीदिन आहे. त्यामुळं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व धर्मांतील चांगल्या गोष्टींचे त्या अनुकरण करायच्या. आमच्या घरी ज्या आत्मीयतेने दिवाळी साजरी केली जायची तितक्याच धामधुमीत ख्रिसमस साजरा व्हायचा. ईदला बिर्याणी यायची. सणवारांदिवशी संपूर्ण भारतीय उपखंड आणि पाश्चिमात्य संस्कृती एकाच छताखाली नांदत असल्यासारखे वाटायचे.
प्रथम स्मृतीदिन
आज दिदिंचा प्रथम स्मृतीदिन आहे. त्यामुळं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईसह राज्यभरात लता दिदिंना अभिवादन करण्यासाठी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी विविधा सांगितिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज काही लोकांना दिदिंची गाणी ऐकल्याशिवाय झोप लागत नाही किंवा दिदिंच्या गाण्यांची एवढी सवय झाले की, दिदिंचे गाणे हे आयुष्याच अविभाज्य घटक झाला असल्याचं त्यांच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.