मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज टोलप्रश्नी सरकारचे प्रतिनिधी आणि राज ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. यानंतर पत्रकार परिषद तर कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच मान्सून परतीच्या मार्गावर… जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (14 ऑक्टोबर) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला नरेंद्र मोदी हजेरी लावणार असून, 14 ते 17 ऑक्टोबरला मुंबईत ऑलिम्पिक समितीचं अधिवेशन होणार आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा सरकारचे प्रतिनिधी आणि राज ठाकरे यांच्या घरी सकाळी ८ वाजता बैठक होणार आहे. आणि यानंतर दहा वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी तेलंगणा आणि मिझोराम दौऱ्यावर मिझोराममध्ये 15 आणि 16 ऑक्टोबरला राहुल गांधींची रॅली आहे. तेलंगणामध्ये 18- 19 आणि 20 ऑक्टोबरला राहुल गांधी यांची यात्रा असणार आहे.
अजित पवार भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा पहिलाच बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा. भाजपच महासंपर्क अभियान आज बारामती मतदारसंघात आहे.
आमदार अपात्रेसंदर्भातील सुनावणी अडीच तासानंतर संपली. शिंदे गटाच्या वकिलांनी 20 तारखेनंतर निर्णय अपेक्षित असल्याचं म्हंटलं आहे.
भाजपा नेते आमदार नितेश राणे यांची आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
मान्सून परतीच्या मार्गावर… राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
पुणे – ससून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भूषण पाटील व अभिषेक बलकवडे याला पुणे पोलीस आज नाशिकला तपासासाठी घेऊन जाणार
मध्य रेल्वेकडून दसरा/दिवाळी/छठ सणानिमित्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत
आज विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यात सामना होणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषदा
१) नाव – श्री. हरिसिंग बद्रुसिंग साबळे.
तारीख – १३ ऑक्टोबर २०२३ – लोकमान्य सभागृह.
वेळ – दुपारी – ०४.०० वाजता.
विषय – महाराष्ट्रीय मराठी तथा आदिवासी मागासवर्गीय अधिकाऱ्यांवरील अत्याचाराबाबत जनजागृतीस पत्रकार परिषद.
पत्रकार परिषद / कार्यक्रम घेणार – श्री. हरिसिंग बद्रुसिंग साबळे.
०२) नाव – माय इंटिग्रेटींग सोसायटी, इंडिया नेट.
तारीख – १३ ऑक्टोबर २०२३ – लोकमान्य सभागृह.
वेळ – दुपारी – ०३.०० वाजता.
विषय – मूळ रहिवाश्याना बाहेरील अतिक्रमणापासून मुक्ती.
पत्रकार परिषद / कार्यक्रम घेणार – ऍड. पिल्ले.