Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समस्या तातडीने सोडवा, अन्यथा निलंबनाची कारवाई करणार; प्रताप सरनाईकांचा देवगड आगारातील अधिकाऱ्यांना इशारा

संबंधित समस्या सोडवून त्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करा, अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा सरनाईक यांनी विभाग नियंत्रक व संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2026 | 04:22 PM
समस्या तातडीने सोडवा, अन्यथा निलंबनाची कारवाई करणार; प्रताप सरनाईकांचा देवगड आगारातील अधिकाऱ्यांना इशारा

समस्या तातडीने सोडवा, अन्यथा निलंबनाची कारवाई करणार; प्रताप सरनाईकांचा देवगड आगारातील अधिकाऱ्यांना इशारा

Follow Us
Follow Us:

देवगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व आगारांच्या परिसरात ७८ हजार झाडे लावण्याचा संकल्प राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. रविवारी देवगड आगाराला भेट देऊन त्यांनी बसस्थानकाची सविस्तर पाहणी केली. यावेळी प्रवासी, नागरिक आणि एसटी कर्मचाऱ्यांनी विविध समस्यांचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचला. यावर तात्काळ दखल घेत संबंधित समस्या सोडवून त्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करा, अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा सरनाईक यांनी विभाग नियंत्रक व संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

 

देवगड बसस्थानकाच्या पाहणीदरम्यान स्वच्छता, प्रवाशांसाठीच्या सुविधा तसेच स्थानकातील विविध बाबींविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. एसटी स्थानकांमधील अस्वच्छता दूर करण्यासाठी यांत्रिक झाडूची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. देवगड आगारातील या दौऱ्यात परिवहन मंत्र्यांनी प्रवासी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. तसेच एसटी स्थानकांमधील सुविधा, स्वच्छता आणि प्रशासनातील कार्यक्षमता सुधारण्यासाठी कठोर भूमिका घेतल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी दुपारी देवगड बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार राजन तेली, शिवसेना नेते संजय आग्रे, संदेश पटेल, तालुकाप्रमुख विलास साळसकर, उपसभापती अमोल लोके, विभाग नियंत्रक दीपक घोडे, पंचायत समिती सदस्या सलोनी तळवडेकर, यंत्र अभियंता पांडूरंग वाघमोडे, आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर, स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर आदी अधिकारी, कर्मचारी तसेच एसटीच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्वच्छतागृहाची पाहणी; अधिकाऱ्यांना खडेबोल

मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील सुलभ शौचालयाची पाहणी केली. यावेळी स्वच्छता कर्मचारी साफसफाई करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर ‘मंत्री आले म्हणूनच स्वच्छतेचे काम सुरू आहे का?’ असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. बसस्थानकातील स्वच्छतेवर विशेष भर द्या, तसेच प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था, नवीन पंखे, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यानंतर त्यांनी संपूर्ण बसस्थानकाची पाहणी करत बुक स्टॉल आणि पेपर स्टॉललाही भेट दिली. स्टॉलधारकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांच्यासमोर आपल्या समस्या मांडत निवेदन सादर केले. कर्मचारी कमतरता, बसगाड्यांची अवस्था आणि इतर प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले.

यावर बोलताना सरनाईक यांनी एसटीच्या ताफ्यात आधुनिक इलेक्ट्रिक बसांचा समावेश करण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगितले. भविष्यात नव्याने उपलब्ध होणाऱ्या गाड्यांमध्ये इलेक्ट्रिक बसेसना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या नवीन भरती प्रक्रियेलाही लवकरच गती दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले. सीएनजी बसांच्या वापराबाबत समाधानकारक अनुभव नसल्याचेही त्यांनी सांगितले. बसस्थानकातील हिरकणी कक्ष अधिक सुसज्ज करणे, कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देणे तसेच गरम आणि थंड पाण्याची सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : पुणे विधानपरिषद उमेदवारीवरून मोठा गोंधळ, विक्रम काकडेंना मिळाली उमेदवारी तर सुनील टिंगरेंची बंडखोरी

महिला कर्मचाऱ्याला दिलासा; बदलीच्या ठिकाणी तात्काळ कार्यमुक्ती

देवगड आगारात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या आईच्या गंभीर आजारपणामुळे मुंबई येथे बदलीसाठी अर्ज केला होता. बदलीचे आदेशही प्राप्त झाले होते. मात्र गर्दीचा हंगाम असल्याचे कारण देत त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. याबाबत संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. आईच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन सरनाईक यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत त्या कर्मचाऱ्याला बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतः त्या आदेशावर स्वाक्षरी करून महिला कर्मचाऱ्याला तातडीने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचा मार्ग मोकळा करून दिला.

Web Title: Transport minister pratap sarnaik has warned the officials at devgad depot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Devgad
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक
1

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक

MSRTC Electric Bus: २०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’! संपूर्ण ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य
2

MSRTC Electric Bus: २०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’! संपूर्ण ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य

ST News : ‘एसटी तेथे एसटी!’ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी लालपरीची खास धाव; 100 मिडी बसेस ताफ्यात दाखल होणार
3

ST News : ‘एसटी तेथे एसटी!’ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी लालपरीची खास धाव; 100 मिडी बसेस ताफ्यात दाखल होणार

MSRTC NCMC Card: महिला अन् ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड असेल तरच मिळणार सवलतीचे तिकीट, अन्यथा…
4

MSRTC NCMC Card: महिला अन् ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड असेल तरच मिळणार सवलतीचे तिकीट, अन्यथा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.