Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad Accident: पुणे-बेंगलोर हायवेवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत चाकाखाली सापडून दुचाकीस्वार ठार

Accident News: गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूर नाका येथे आले असता कंटेनरची (क्र. आर. डी.०६ जी.डी. ८३५१) दुचाकीला धडक झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 23, 2025 | 05:00 PM
Karad Accident: पुणे-बेंगलोर हायवेवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत चाकाखाली सापडून दुचाकीस्वार ठार
Follow Us
Close
Follow Us:
कराड: पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावर कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण कंटेनरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. गुरुवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.  अशोक शिवराम जमाले (वय ६५) रा. मुंढे, ता. कराड असे अपघातात ठार झालेल्याचे नावे आहे.
याबाबत पोलिसांकडून, तसेच घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अशोक जमाले हे दुचाकीवरून (क्र. एम एच ११ एवाय २३९६) कराड येथे घरचा बाजार करण्यासाठी गेले होते. बाजार घेऊन ते मुंढे येथे घरी जात असताना दुपारी २.३९ वाजण्याच्या सुमारास जुन्या पुलावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे ते कोल्हापूर नाका मार्गे घरी जात होते. गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूर नाका येथे आले असता कंटेनरची (क्र. आर. डी.०६ जी.डी. ८३५१) दुचाकीला धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार कंटेनरच्या मागील चाकाखाली चिरडल्याने जागीच ठार झाला.
अपघाताची माहिती मिळतातच दस्तगीर आगा, प्रफुल्ल बाबर, शेखर बर्गे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताची माहिती महामार्ग पोलीस व शहर पोलीस ठाण्याला दिली. वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातात पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

खडकवासला धरणाजवळ अपघात

खडकवासला धरण परिसरात भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष माधव मते (वय ४७, रा. खडकवासला) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालक रोहित दत्तात्रय चव्हाण (रा. खडकवासला) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश माधव मते (वय ४५, रा. खडकवासला) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष मते हे १० मे रोजी खडकवासला धरण परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मते यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मते यांचे भाऊ अविनाश यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालक रोहित चव्हाण याने मद्यप्राशन करुन अपघात केल्याचे मते यांनी तक्रारी म्हंटले आहे. सहायक निरीक्षक यादव तपास करत आहेत.

खडकवासला धरणाजवळ अपघात; रिक्षाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एअरपोर्ट-लोहगाव रस्त्यावर घडली आहे. रोशनकुमार सिंह (वय २९, रा. वाघोली) असे या अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत रोशनचा भाऊ पवनकुमार याने तक्रार दिली आहे. याप्रकरणी विजय कैलास भगत (वय २५) याच्यावर विमानतळ पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Two wheeler person loss their life in accident karad marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • Accident News
  • Karad
  • Karad news

संबंधित बातम्या

Maval Accident News : शिवज्योत आणताना काळाचा घाला! भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू
1

Maval Accident News : शिवज्योत आणताना काळाचा घाला! भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Hingoli News : पीकअप वाहन नदीपात्रात कोसळले; बेलदरी धरणाजवळील अरुंद अन् धोकादायक पुलावर दुर्घटना
2

Hingoli News : पीकअप वाहन नदीपात्रात कोसळले; बेलदरी धरणाजवळील अरुंद अन् धोकादायक पुलावर दुर्घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.