Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad News: मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येण्यापूर्वीच काळाचा घाला! उरीत कर्तव्य बजावताना शहापूरचे सुपुत्र अर्जुन जाधव हुतात्मा

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ गस्त घालताना झालेल्या भीषण स्फोटात कराडचे जवान अर्जुन राजेंद्र जाधव आणि ऐरोलीचे जवान विक्रम चव्हाण यांना वीरमरण आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 11, 2026 | 05:23 PM
मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येण्यापूर्वीच काळाचा घाला!

मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येण्यापूर्वीच काळाचा घाला!

Follow Us
Follow Us:
  • मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येण्यापूर्वीच काळाचा घाला!
  • उरीत कर्तव्य बजावताना शहापूरचे सुपुत्र अर्जुन जाधव हुतात्मा
कराड/प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहापूर (ता. कराड) येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव (वय ३०) यांना वीरमरण आले. नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना झालेल्या हॅण्ड ग्रेनेडच्या भीषण स्फोटात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेने शहापूर गावासह संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.

अर्जुन जाधव हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे जवान असलेल्या अर्जुन यांची सध्या जम्मू-काश्मीरमधील ८ राष्ट्रीय रायफल्स (आरआर) युनिटमध्ये नियुक्ती होती. मंगळवारी उशिरा उरी सेक्टरमधील कमलकोट भागात नियंत्रण रेषेजवळ नियमित गस्तीदरम्यान अचानक भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अर्जुन जाधव यांच्यासह आणखी एका जवानाला वीरमरण आले.

स्फोटानंतर सहकाऱ्यांनी तत्काळ जखमी जवानांना श्रीनगर येथील बदामीबागमधील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय पथकाने त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र उपचार सुरू असतानाच अर्जुन यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुर्घटनेत वीरमरण आलेले दुसरे जवान विक्रम चव्हाण हे ऐरोली (नवी मुंबई) येथील रहिवासी असल्याचे समजते.

कराड उड्डाणपुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी, कामाला गती देण्याच्या सूचना

दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, तो भूसुरुंगाचा होता की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास लष्कराकडून सुरू आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हुतात्मा जवानांचे पार्थिव लष्करी इतमामात त्यांच्या मूळगावी पाठविण्यात येणार आहे. अर्जुन जाधव यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. १२) शहापूर येथे पोहोचण्याची शक्यता आहे.

अर्जुन यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील, भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांचे धाकटे बंधू ऋषी जाधव हे भारतीय नौदलात कार्यरत असून सध्या सुटीवर गावी आले आहेत. देशसेवेची परंपरा जपणाऱ्या या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वाढदिवसाच्या आनंदावर दुःखाची सावली

२५ जून रोजी अर्जुन जाधव यांचा मुलगा सर्वेश याचा पहिला वाढदिवस साजरा होणार होता. त्या आनंदसोहळ्यासाठी अर्जुन यांनी १५ जूनपासून सुटी घेऊन गावी येण्याचे नियोजन केले होते. कुटुंबीयांनीही वाढदिवसाची तयारी सुरू केली होती. मात्र, त्यापूर्वीच उरीतील स्फोटात त्यांना वीरमरण आल्याने वाढदिवसाच्या उत्सवाचे स्वप्न कायमचे अपुरे राहिले. या घटनेमुळे जाधव कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरली आहे.

Karad Political News: बाळासाहेब चोरेकर यांना मारहाण; उंब्रज परिसरात तणाव, पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल

Web Title: Karad soldier arjun jadhav and airoli soldier vikram chavan martyred in uri blast jammu kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • Karad news
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

कोरेगावच्या विकासाला नवे पंख; ३६ वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा शिक्का अखेर रद्द, पाच हजार मिळकतधारकांना मोठा दिलासा
1

कोरेगावच्या विकासाला नवे पंख; ३६ वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा शिक्का अखेर रद्द, पाच हजार मिळकतधारकांना मोठा दिलासा

Satara Politics: पक्षांतराचा प्रश्नच नाही…; अविनाश मोहितेंनी स्पष्टच सांगितलं
2

Satara Politics: पक्षांतराचा प्रश्नच नाही…; अविनाश मोहितेंनी स्पष्टच सांगितलं

कराड पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; अहेरीतील अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध
3

कराड पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; अहेरीतील अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध

कृष्णा कारखाना निवडणूक : ‘कपबशी’ विरुद्ध ‘नारळ’ लढत, दोन अपक्षांना ट्रॅक्टर व शिट्टी
4

कृष्णा कारखाना निवडणूक : ‘कपबशी’ विरुद्ध ‘नारळ’ लढत, दोन अपक्षांना ट्रॅक्टर व शिट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.