मयुर फडके, मुंबई : एल्गार परिषद (Elgar Parishad) आणि शहरी नक्षलवाद प्रकरणातील (Urban Naxalism Case) आरोपी तेलुगु कवी वरवरा राव (Varavara Rao) (८२) यांनी मोतींबिदूच्या शस्त्रक्रियेसाठी (Cataract Surgery) हैद्राबाद (Hydrabad) येथे जाण्यास परवानगी नाकारणाऱ्या विशेष एनआयए न्यायालयाच्या (NIA Court) आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान (Challenge In High Court) दिले आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने एनआयएला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहे.
वरवरा राव यांना २०१८ मध्ये अटक करण्यात आल्यानंतर मार्च २०२१ पर्यंत ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०२२ वैद्यकीय कारणास्तव अटीशर्तीसह जामीन मंजूर केला होता. आदेशातील अटीनुसार राव यांना मुंबई विशेष एनआयए न्यायालयाचे कार्यक्षेत्र सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
[read_also content=”प्राण्याच्या अपघाती मृत्यूचे प्रकरण : बेदरकार गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, याचिकाकर्त्याविरोधतील गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याचे पोलिसांना आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/accidental-death-of-animal-case-of-reckless-driving-cannot-be-registered-high-courts-critical-observation-order-against-police-to-quash-chargesheet-and-chargesheet-against-petitioner-nrvb-359524.html”]
सप्टेंबर २०२२ मध्ये राव यांनी मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात मोतींबिदूच्या शस्त्रक्रियेसाठी तीन महिने हैदराबादमध्ये राहण्याची परवानगी मागणार अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्या निर्णयाला राव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. आर. जी अवचट यांच्यासमोर सुनावणी झाली.
मुंबईत शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय उपचार महागडे असून आपण तेलंगणा येथील निवृत्तीवेतन धारक असल्याने वैद्यकीय सेवेस पात्र आहेत, असा दावा राव यांनी याचिकेतून केला आहे. तसेच मुंबईतील सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून आपल्याला तात्पुरता जामीन देताना हीच बाब विचारात घेण्यात आली असल्याचेही राव यांनी याचिकेत नमूद केले आहे. तसेच ६ मार्च २०२१ पासून जामीनावर असताना आपण कोणत्याही अटीशर्तींचे अथवा स्वातंत्र्याचे उल्लंघन केले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे विशेष न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करून आपल्याला हैद्राबादेत उपचारासाठी जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही राव यांनी केली आहे.
[read_also content=”धक्कादायक! महिला डॉक्टरने पेन किलरचा ओव्हर डोस घेऊन संपवले जीवन, लिहले.. ‘मी इतका स्ट्रेस घेऊ शकत नाही, सॉरी मम्मी,पप्पा’ https://www.navarashtra.com/crime/shocking-bhopal-crime-female-doctor-ends-life-after-overdosing-on-pain-killers-wrote-suicide-note-sorry-mummy-pappa-nrvb-359512.html”]