Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Election : एकपक्षीय राजवटीचा भाजपाचा डाव उधळून लावा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

विरोधी पक्षांना संपवून एकपक्षीय राजवट आणण्याचा भाजपचा डाव उधळून लावा," असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 12, 2026 | 01:05 PM
एकपक्षीय राजवटीचा भाजपाचा डाव उधळून लावा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

एकपक्षीय राजवटीचा भाजपाचा डाव उधळून लावा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

Follow Us
Follow Us:
  • विरोधी पक्षांना संपवण्याचा डाव
  • भाजपाचा डाव उधळून लावा
  • प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
पुणे : छोट्या व प्रादेशिक पक्षांना फोडून त्यांना कमकुवत करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. काँग्रेसमध्ये अवसान राहिलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांना संपवून एकपक्षीय राजवट आणण्याचा भाजपचा डाव उधळून लावा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना केले. हुकुमशाही पद्धतीने वागणाऱ्या भाजपाशी दोन हात करण्याची धमक केवळ वंचित बहुजन आघाडीकडेच आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

पुणे महानगरपालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ॲड. आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस प्रियदर्शन तेलंग, शहराध्यक्ष अरविंद तायडे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजू ओव्हाळ यांनी सभेचे संयोजन केले. प्राण आवाड सूत्रसंचालन केले.

ॲड. आंबेडकर म्हणाले,”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले. मात्र आज संविधानात बदल करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. संविधान धोक्यात आहे, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. संविधानाच्या रक्षणासाठी जागृत राहावे लागेल. कारण जोवर आपण जागरूक आहोत, तोवर संविधानाला हात लावण्याची हिंमत होणार नाही. भाजपाला हरवायचे असेल, तर आपल्याला शंभर टक्के मतदान करावे लागेल. सामान्यांच्या हक्कांसाठी, शोषित, पीडित, वंचित व मागास घटकांसाठी न्याय मिळवून देणार्‍या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे. लोकांची घरे, पक्ष फोडून, भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन राजकारणाचे तीनतेरा वाजवणाऱ्या भाजपला घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशा खरमरीत शब्दांत आंबेडकरांनी भाजपवर हल्ला चढविला.

आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था दयनीय असून, एका शिवसेनेत जान नाही, तर दुसर्‍या शिवसेनेला खच्ची करण्याचे काम भाजपने केले आहे. अशावेळी जनतेच्या हितासाठी काम करणारे व लढणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन मतदारांना आंबेडकर यांनी केले.

गायकवाड म्हणाले, पुणे शहरातील फुले शाहू आंबेडकरी विचारांचे लोक एकवटले असून, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. काँग्रेससह अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना सर्वानीच शहराचे वाटोळे करण्याचे काम केले आहे. अलिकडेच अजित पवार यांनी महार वतनाची जमीन लाटण्याचा केलेला प्रयत्न, तसेच शरद पवार यांचा पक्ष गिळंकृत करण्याचा केलेला प्रयत्न याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. या निवडणुकीत गुंडांना पाठीशी घालून त्यांना उमेदवारी देणार्‍या भाजप आणि राष्ट्रवादीला पराभूत करण्याचे काम आपल्याला करायचे आहे.”

Web Title: Vanchit bahujan aghadi president prakash ambedkar has criticized the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Adv Prakash Ambedkar
  • Election News
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
1

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी
2

‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
3

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी
4

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.