आता अमरावती-पुणे 'वंदे भारत' लवकरच धावणार; प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार(फोटो सौजन्य-X)
मुंबई : मुंबई ते नागपूर प्रवासादरम्यान वेळेची बचत होणार असून, लवकरच या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. त्यामुळे जिथे मुंबईहून नागपूरला पोहोचण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेनने 14 ते 20 तास लागत होते, ते अंतर आता नऊ तासांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे जवळपास पाच ते सहा तासांच्या वेळेची बचत होणार आहे.
मुंबई-नागपूरदरम्यान प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेने या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. 160 किमी प्रतितास वेगाने धावणारी वंदे भारत सीएसएमटी ते नागपूर या प्रवासादरम्यान 8 स्थानकावर थांबेल.
यामध्ये वर्धा, भंडारा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि दादर या स्थानकावर वंदे भारत थांबणार आहे. काही दिवसांतच नागपूर ते मुंबई या रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेनही धावण्याची शक्यता आहे. या मार्गावर चाचपणी सुरू आहे.
1500 ते 2000 एसी चेअर कारचे तिकिट
1500 ते 3500 हजारांपर्यंत वंदे भारत ट्रेनचे तिकीट असणार आहे. त्यातच 1500 ते 2000 एसी चेअर कारचे तिकिट असेल, अशीही माहिती दिली गेली आहे. मुंबई ते नागपूर यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला 8 बोगी असतील. यामध्ये एक बोगी एक्झिक्युटीव्ह एसी असेल तर सात बोगी या एसी चेअर कार असतील. यामार्गावर प्रवासाला 9 ते 10 तास लागतील.
एक्झिक्युटीव्ह एसी बोगीचे तिकिट 2500 ते 3500 रूपये
मुंबई ते नागपूर यादरम्यान एसी चेअर कारचे तिकिट अंदाजे 1500 ते 2000 रूपये इतके असेल. तर एक्झिक्युटीव्ह एसी बोगीचे तिकिट 2500 ते 3500 रूपये इतके आहे. तिकिटाच्या किंमतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.