बदलापूर – बदलापूर पश्चिम येथील प्रभाग क्र ३ एरंजाड येथे एक आठवडा मोफत आधारकार्ड शिबिराचे आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जवळपास दोनशेच्यावर जणांनी मोफत आधारकार्ड शिबिरास भेट देऊन, आपले आधार कार्ड अपडेट व नवीन आधार कार्ड काढून घेतले. या शिबिराचे आयोजन सौ.कविता किशोर मेहेर (महिला विभागप्रमुख प्र. क्र.३), श्री.किशोर धाऊ मेहेर (समाजसेवक), आणि श्री.मयुर सुरेश मेहेर (शाखाप्रमुख) यांच्यातर्फे करण्यात आले होते. तसेच आता सोनिवली विभागात देखील मोफत आधारकार्ड शिबिराचे आयोजन शिवसेना प्रभाग ३ तर्फे करण्यात आले आहे. याला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मोफत कोर्सेसचे आयोजन…
दरम्यान, आगामी काळात महिलांसाठी मोफत शिवणकाम, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायन आदी कोर्सेसचे आयोजन करणार असल्याचं समाजसेवक किशोर मेहेर यांनी सांगितले. या मोफत कोर्सेसचा लाभ विभागातील महिलांनी घ्यावा, असं आवाहन महिला विभागप्रमुख सौ.कविता किशोर मेहेर यांनी केलं आहे. तसेच समाजसेवक किशोर मेहेर यांच्याकडून विभागात विविध सामाजिक कामे केली जाताहेत. रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, मोफत कोर्सेस, आधार कार्ड आदी कामे प्रभाग क्र ३ येथे शिवसेना महिला विभागप्रमुख, सौ.कविता किशोर मेहेर, समाजसेवक, किशोर धाऊ मेहेर, आणि शाखाप्रमुख, मयुर सुरेश मेहेर, यांच्यातर्फे करण्यात येत आहेत.