Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर विमानतळाला गावकऱ्यांचा ठाम विरोध; दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव

पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील ग्रामसभेत दिवाळी पाडव्याच्या दिवशी गावकऱ्यांनी एकमुखाने ठराव मंजूर करत प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 24, 2025 | 03:07 PM
मराठवाड्याच्या विकासाला मिळणार चालना; छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच होणार आंतरराष्ट्रीय विमानतळ

मराठवाड्याच्या विकासाला मिळणार चालना; छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच होणार आंतरराष्ट्रीय विमानतळ

Follow Us
Follow Us:
  • पुरंदर विमानतळाला गावकऱ्यांचा ठाम विरोध
  • दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव
  • ग्रामस्थांनी निर्धार केला व्यक्त
पुणे : पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील ग्रामसभेत दिवाळी पाडव्याच्या दिवशी गावकऱ्यांनी एकमुखाने ठराव मंजूर करत प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला. “एकाही शेतकऱ्याची जमीन जाणार नाही आणि गावातील एकाही नागरिकाला अन्याय सहन करावा लागणार नाही,” असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

गेल्या काही वर्षांपासून पुरंदर विमानतळ प्रकल्पाविषयी परिसरात मतभेद आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. काहीजण विमानतळाच्या बाजूने तर काही विरोधाच्या भूमिकेत होते. मात्र, यावर्षीच्या दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेने हे मतभेद बाजूला ठेवत ऐक्याचा सूर लावला. सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी, महिला आणि युवक उपस्थित होते.

गावातील कोणताही नागरिक स्वतंत्रपणे शासनाशी चर्चा करणार नाही. सर्व संवाद, निवेदन आणि निर्णय ग्रामपातळीवरील कृती समितीमार्फतच होतील. या समितीचे गठन पुढील काही दिवसांत करण्यात येईल, असेही यावेळी ठरवण्यात आले.

“आमच्या जमिनींचा सौदा मान्य नाही”

सभेत बोलताना ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक शेतकरी नेत्यांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. “विकासाच्या नावाखाली आमच्या शेतीवर गदा येणार असेल, तर तो विकास आमच्यासाठी विनाशकारी ठरेल,” असे मत एका ज्येष्ठ शेतकऱ्याने मांडले.
काही युवकांनी पुनर्वसन, रोजगार आणि पर्यायी उपजीविकेच्या संधी याविषयी प्रश्न उपस्थित केले. या सर्व मुद्द्यांवर अभ्यासगट नेमून शासनाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे ठरले.

Web Title: Villagers have strongly opposed purandar airport in the gram sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत
1

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
2

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना
3

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
4

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.