Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेल्या टक्क्याचा काेणाला धक्का?, साताऱ्यात सुमारे 3 टक्क्यांनी मतदान वाढले

मतदान वाढीसाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य केल्याने सातारा लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे ६३ टक्क्यांवर मतदान झाल्याने हा वाढता टक्का कोणाला धक्का अन‌् कोणाला हात देणार, याबाबत मंथन सुरू झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 09, 2024 | 10:42 AM
वाढलेल्या टक्क्याचा काेणाला धक्का?, साताऱ्यात सुमारे 3 टक्क्यांनी मतदान वाढले
Follow Us
Close
Follow Us:
सातारा : मतदान वाढीसाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य केल्याने सातारा (Satara) लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे ६३ टक्क्यांवर मतदान झाल्याने हा वाढता टक्का कोणाला धक्का अन‌् कोणाला हात देणार, याबाबत मंथन सुरू झाले आहे. तरीही भाजप आणि राष्ट्रवादीने आम्हीच विजयी होण्याचा दावा ठोकला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सुमारे १९ लाख मतदार निवडणुकीसाठी पात्र होते. त्यातील ६३ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. तरीही अंतिम आकडेवारी आल्यानंतर मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे. त्यातच मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचे प्रमाण वाढले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांत जागृती केली. याचा परिणाम मतदान वाढीत झाला आहे. पण मतदानाची ही वाढती टक्केवारी काहींना डोकेदुखी ठरू शकते. याचे अनुमान आताच बांधणे अवघड असले तरी प्रमुख राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत.
सातारा मतदारसंघात एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही नशीब अजमावले. तरीही खरी लढत ही भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. या दोघांनी मतदारसंघात प्रचाराचे रान उठवले होते. तसेच या दोघांसाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांनी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे मतदारसंघात चुरस निर्माण झालेली.
मतदान झाले असले तरी मतमोजणीनंतरच वाढत्या मतदानाने कोणाला आधार दिला हे स्पष्ट होणार आहे. पण तोपर्यंत विचारमंथन होत राहणार आहे. तरीही संपूर्ण मतदारसंघात निवडणूक चुरशीची झाली. कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, कोरेगाव या विधानसभा मतदारसंघांत भाजप आणि राष्ट्रवादी उमेदवारांत मते मिळविण्यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या निवडणुकीचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे. यासाठी ४ जूनचीच वाट पाहावी लागणार आहे.
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा
२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार उदयनराजे भोसले हे निवडून आले होते. त्यानंतर उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली. ही निवडणूक विधानसभेबरोबरच झाल्याने चुरस होती. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी ६७ टक्के मतदान झाले होते. या वाढीव मतदानात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या विजयाचे गणित होते.
वाढीव ३ टक्के काेणाच्या पारड्यात
१९९१ पासून आतापर्यंत लोकसभेसाठी आठ सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्ये सर्वात कमी मतदान २००९ च्या निवडणुकीत ५२.८ टक्के झाले होते, तर १९९९ च्या निवडणुकीत ७१.४१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१९ च्या निवडणुकीत ६०.४७, तर आता ६३ टक्क्यांवर मतदान झाले आहे. हे वाढीव ३ टक्के मतदानच मतदारसंघाचा फैसला करणार आहे.

Web Title: Voter turnout increased by 3 percent in satara nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2024 | 10:41 AM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Shashikant Shinde

संबंधित बातम्या

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…
1

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
2

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
3

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
4

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.