Wai Law and Order on Eid-e-Milad
तसेच आगामी सण-उत्सवांच्या काळात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पूर्ण झाल्यानंतर वाई शहरातून रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्चचा मार्ग किसनवीर चौक पी.आर. चौक जामा मशीद चावडी चौक दातार हॉस्पिटल ब्राह्मण शाही चौक किसनवीर चौक मोठा पूल पोलीस स्टेशन, वाई असा होता.रूट मार्चदरम्यान आगामी ईद-ए-मिलाद व इतर सण-उत्सवांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन सण-उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावेत, या दृष्टीने पोलीस बंदोबस्त व कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर रूट मार्चमध्ये वाई पोलीस ठाण्याकडील २ अधिकारी, २३ अंमलदार, १० होमगार्ड, पाचगणी पोलीस ठाण्याकडील ३ अंमलदार, सातारा मुख्यालयाकडील १ RCP पथक, १ प्रशिक्षक तसेच ३ शासकीय वाहने सर्व साहित्यासह सहभागी झाले होते अशा प्रकारे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम व रूट मार्च शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.






