फोटो सौजन्य सोशल मिडिया
Sambhajinagar News : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संगणकीय तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. संगणक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्याथ्यांनी विश्वासाने नवतंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन नीड डाटाचे प्रशिक्षक पुष्कराजसिंह राठोड यांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजी नगर येथील सुप्रियाताई सुळे कॉलेज ऑफ मैनेजमेंट सायन्स, हसूल, आणि मॉडर्न कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘सेमिनार ऑन डेटा अॅनालिटिक्स विथ जनरेटिव्ह एआय या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राठोड हे बोलत होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘नीड डेटा’चे संस्थापक पुष्पराज सिंह राठोड उपस्थित होते.
हा परिसंवाद देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे, प्रा अर्जुन राठोड, प्रा. राम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य डॉ. कृष्णा कांबळे यांनी डेटा अॅनालिटिक्स आणि जनरेटिव्ह एआय या आधुनिक तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख वक्ते पुष्पराज सिंह राठोड यांनी डेटा अॅनालिटिक्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून योग्य निर्णय कसे घेता येतात, याबाबत माहिती दिली.
आयटेलचा नवा म्युझिक फोन लाँच; 2500 mAh बॅटरीसह सुपर लाउड साऊंड
तसेच जनरेटिव्ह एआयच्या साहाय्याने मजकूर, चित्रे आणि विविध प्रकारची डिजिटल सामग्री तयार करता येते. शिक्षण, व्यवसाय आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेत नवीन कौशल्ये आत्मसात करावीत, तंत्रज्ञानाचा सर्जनशील व जबाबदारीने वापर करावा आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला तयार करावे, प्रा.डॉ. अस्मिता साळवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडर्न कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटीचे प्राचार्य डॉ. नामदेव सानप होते. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि नावीन्यपूर्ण विचारसरणी विकसित करण्याची गरज व्यक्त केली. या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. हर्षद वाघमारे, प्रा. संतोष प्रधान, प्रा. ज्योती मोरे, प्रा. राजेंद्र भगत, प्रा. डॉ प्रज्ञा किंवंडे, प्रा.तुबा सय्यद, प्रा. अनिकेत दंडाळे प्रा. ऋषिकेश राजपूत, प्रा. गौरव अस्तुरे तसेच श्री. मिथुन खाडे, विशाल बोर्ड यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन प्रा. अनघा भोर तर आभार प्रदर्शन संकेत गाडेकर यांनी मानले.
इन्व्हर्टरवर घरातली कोणती उपकरणे चालवावीत? पावसाळ्यात अर्थिंग करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या






