( सौजन्य - सोशल मीडिया )
Wardha News : खरीप हंगामातील पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यात ९४ हजार ४२३ शेतकऱ्यांनी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा १ लाख ७५ हजार २१५ अर्जाची नोंदणी झाली आहे. या माध्यमातून तब्बल १ लाख ८५ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण मिळाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित १ कोटी १३ लाख ३२ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे.
नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पावसातील खंड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी पीकविमा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला आहे. खरीप पिकांचे हंगामात असमानी व सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते. यापासून बचाव होण्याकरीता व आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी सरकारने पीकविमा योजना लागू केली आहे.
वर्ष २०२४ मध्ये केवळ एक रुपया भरून पिकांचा विमा काढण्यात येत होता. त्यावर्षी २ लाखांवर शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला होता. २०२५ मध्ये ही योजना बंद करण्यात ३५ हजार आली. पीकविम्यासाठी ८४५ शेतकऱ्यांना काही रक्कम भरावी लागली. यामुळे शेतकऱ्यांनी पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद दिला नाही. २०२५ मध्ये केवळ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी ५८ हजार ६९३ अर्ज केले होते. यावर्षी प्रीमियम रकमेत कपात केल्याने ९४ हजार ४२३ शेतकऱ्यांनी १ लाख ७५ हजार २१५ अर्ज केले आहेत. यातून १ लाख ८५ हजार ३०१ हेक्टर शेतीला विम्याचे संरक्षण मिळाले आहे. शेतकऱ्यांनी १ कोटी १३ लाख ३२ हजार १० रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे भरली आहे. त्यामुळे यंदा पीकविमा योजनेतील शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे.
यावर जिल्हा अधीक्षक, अरविंद उपरीकर म्हणाले, “खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून ने काढणीपर्यंत कालावधीत नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरित परिणाम करणाऱ्या हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोगाच्या आधारे, महसूल मंडळामध्ये पिकांच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहित धरून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.”
हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक ३७ हजार १९८ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. देवळी तालुक्यात २४ हजार ५६६, वर्धा तालुक्यात २० हजार ५२१, सेलू तालुक्यात २० हजार १८०, कारंजा तालुक्यात १५ हजार ८७, आर्वी तालुक्यात १६ हजार २१२, आष्टी तालुक्यात ९ हजार ३३५ आणि समुद्रपूर तालुक्यात ३२ हजार ११६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. विम्याचा लाभ मिळावा. यावर्षी ९४ हजार ४२३ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतल्याने १ लाख ८५ हजार ३०१ हेक्टर मधील पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले आहे.






