Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : वर्ध्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम

वर्ध्यात ऑल इंडिया इंडिजिनस स्टुडंट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. अशोक उईके यांच्या राजीन्यासह वसतिगृह नियमावली रद्द करणे, सुरक्षा आणि शैक्षणिक सुविधांसह २३ मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 18, 2026 | 02:52 PM
Wardha News : वर्ध्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम

Wardha News : वर्ध्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम

Follow Us
Follow Us:
  • उमरी मेघे येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात अनिश्चितकालीन धरणे आंदोलन सुरू.
  • आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम.
  • वसतिगृह आणि आश्रमशाळांशी संबंधित २३ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
 

वर्धा: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मूलभूत आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवरून वर्ध्यात आंदोलन सुरू झाले आहे. ऑल इंडिया इंडिजिनस स्टुडंट फेडरेशन, महाराष्ट्र तसेच शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली उमरी मेघे येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात अनिश्चितकालीन धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी ठाम असून, शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वसतिगृह नियमावली रद्द करण्याची मागणी

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी ५ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेली वसतिगृह नियमावली आणि १४ ऑगस्टचा सुधारित शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. विशेषतः वसतिगृह प्रवेशासाठी लागू असलेली ५/१५ किलोमीटर अंतराची अट हटविण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

Wardha News : वर्ध्यात अंगणवाडी सेविका-मदतनिसांचा जेलभरो; 30 हजार वेतनासह विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार

याशिवाय अकरावीपासूनच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना लागू करून पात्र विद्यार्थ्यांना थेट आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी आहे. आश्रमशाळांमधील सेंट्रल किचन व्यवस्था बंद करून स्वतंत्र भोजन व्यवस्था सुरू करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या २३ प्रमुख मागण्या

विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनासमोर एकूण २३ महत्त्वाचे प्रश्न मांडले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांची उच्चस्तरीय चौकशी करण्याबरोबरच वसतिगृहांमधील सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा कर्मचारी, अग्निसुरक्षा व्यवस्था आणि २४ तास आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या मते, केवळ योजनांची घोषणा करून प्रश्न सुटणार नाहीत. प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची आवश्यकता आहे.

आश्रमशाळांच्या ऑडिटसह दोषींवर कारवाईची मागणी

आश्रमशाळांचे नियमित आणि प्रभावी ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही आंदोलनातून करण्यात आली आहे. यापूर्वी घडलेल्या घटनांची जबाबदारी निश्चित करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध

एआयआयएसएफचे प्रदेशाध्यक्ष सुरज आत्राम यांनी विद्यार्थ्यांचे जीवन, आरोग्य, शिक्षण आणि भविष्य यांच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नसल्याचे म्हटले आहे. केवळ ऑडिटची घोषणा करून प्रश्न सुटणार नाही. व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासोबतच निष्काळजीपणासाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता शासन आणि आदिवासी विकास विभाग या मागण्यांवर कोणती भूमिका घेतात आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पुढील पावले कोणती उचलली जातात, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Wardha tribal students protest ashok uiake resignation aaisf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Student Protest
  • Tribal Community
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Jantar-Mantar protest: विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?; जंतरमंतर आंदोलनाच्या यादीतून बाहेर, दिल्लीत वाद पेटला
1

Jantar-Mantar protest: विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?; जंतरमंतर आंदोलनाच्या यादीतून बाहेर, दिल्लीत वाद पेटला

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
2

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Amravati News: आता ‘सेंट्रल किचन’ वर नजर! आदिवासी विकास विभागाकडून नऊ सदस्यीय अभ्यास समिती गठित
3

Amravati News: आता ‘सेंट्रल किचन’ वर नजर! आदिवासी विकास विभागाकडून नऊ सदस्यीय अभ्यास समिती गठित

MPSC Protest : आंदोलनावरून पडळकर भडकले ! ‘रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागणीने डागलं पाहिजे,’ भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद
4

MPSC Protest : आंदोलनावरून पडळकर भडकले ! ‘रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागणीने डागलं पाहिजे,’ भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.