Sai Dahake on Drinking Water Shortage
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी कारंजा व मानोरा तालुक्यातील सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, पाणीटंचाई व जनावरांच्या चारा टंचाईबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या आढावा बैठकीला आ. सई डहाके, देवव्रत डहाके, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, कारंजा तहसीलदार रवी महाले, मानोरा तहसीलदार राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी पूनम राणे, कृषी अधिकारी अश्विनी भोसले, पशुधन विकास उपायुक्त डॉ. रवी ठाकरे तथा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संकटाच्या काळात नागरिक आणि शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, कोणत्याही गावात पाणी व चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी. यामध्ये कुणीही कुचराई करता कामा नये, जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि संकटसमयी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
आढावा बैठकीत आ. डहाके यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्याकडून दुष्काळ संदर्भातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी गावनिहाय पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध पाणीसाठा आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता, यावर चर्चा करून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बुलढाण्यातही संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी धाड येथे आमदार श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समन्वय बैठक पार पडली. मात्र, या आढाव्यादरम्यान विविध विभागांच्या नियोजनात त्रुटी आणि समन्वयाचा अभाव असल्याचे निदर्शनास आल्याने आमदार महाले यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत पिण्याच्या पाण्याचे नियोजन, ग्रामीण पाणीपुरवठा, जलस्रोतांची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व पाणी तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना द्यावयाच्या मदतीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
Ans: कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सई डहाके यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
Ans: दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे. तसेच, पाणी आणि चारा टंचाईवर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.
Ans: गावनिहाय पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध पाणीसाठा आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता यावर चर्चा झाली.






