यवतमाळ : पाटबंधारे विभाग (Irrigation Department) यवतमाळ अंतर्गत येत असलेल्या एकूण १० प्रकल्पांमध्ये सरासरी पेक्षा अधिक पाऊसमान झाले आहे. त्यामुळे सर्वच प्रकल्प ओसंडून वाहत असून आठ प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग (Water discharge) केला जात आहे. तर, या १० प्रकल्पांमध्ये सरासरी ७८.२९ टक्के जलसाठा असल्याने ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. तर, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जुलै महिन्यामध्ये सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामूळे यवतमाळ जिल्ह्यातील लघू मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्प (Irrigation projects) ओसंडून वाहत आहे. २५ जुलै पर्यंत रोजी ६०६.७ मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ओव्हरफ्लो (overflow ) झाले आहे. तर, यवतमाळ (Yavatmal) पाटबंधारे विभागाअंतर्गत येत असलेल्या १० प्रकल्पामध्ये सरासरी ७८.२९ टक्के जलसाठा नोंद करण्यात आला आहे. यापैकी पाच प्रकल्पामध्ये १०० जलसाठा आहे. तर आठ प्रकल्पांमध्ये जलपातळी वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
यामध्ये पुस प्रकल्पात ५८.८६ टक्के जलसाठा व जलपातळी ३९४.१० मिमी पर्यंत वाढली आहे़ यासोबतच दिग्रस तालुक्यातील अरूणावती प्रकल्पात ४७.९० टक्के जलसाठी असून जलपातळी ३७२.८४ मीटरपर्यंत वाढली आहे. बेंबळा प्रकल्पात ४६.५२ टक्के जलसाठा तर जलपातळी २६६.१५ मिमी पर्यंत वाढल्याने चार दरवाजे २५ सेंमी उघडले असून १०० घसेंमी पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोकी प्रकल्प १०० टक्के भरले असून ३१.१६५ घन सेमीने विसर्ग सूरू आहे. वाघाडी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असून २८.३५ घन सेमीने विसर्ग होत आहे. सायखेडा १०० टक्के भरले, ६९.३७६ घसेमीने पाण्याचा विसर्ग होत आहे. अधरपुस प्रकल्पात ६४.३८ टक्के जलसाठा आहे. दोन गेट १२.५ सेमीने उघडण्यात आले असून २५ घनसेमीने पाण्याचा विसर्ग होत आहे. बोरगाव येथे १०० टक्के असून २ सेमीने पाण्याचा विसर्ग होत आहे. अडाण प्रकल्पात ६५.२३ टक्के जलसाठा असून ३ गेट १० सेमी तर २ गेट ५ सेंमीने उघडण्यात आले आहे. नवरगांव प्रकल्प १०० टक्के भरला असून ४ सेंमीने पाण्याचा विसर्ग होत आहे.
यवतमाळ शहराला पाणी पूरवठा करणारे निळोणा व चापडोह धरण ओसंडून वाहत आहे. तसेच महागाव पाटंबधारे उपविभागाअंतर्गत येत असलेले दराटी, पिंरंजी, तरोडा प्रकल्प १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरले आहे. यवतमाळ-नांदेड या दोन जिल्ह्याच्या सिमेवर असलेले उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण ८०.०६ टक्के भरले आहे. इसापुर धरणावरून यवतमाळ जिल्ह्यातील उमरेखड महागाव तालुक्यात काही गावांना पाणी पूरवठा केल्या जातो. सध्या स्थितीत इसापुर धरणाची देखिल जलपातळी वाढली आहे. येत्या काळातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटल्याने समाधान कारक चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.