मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhavati) येथे थांबले आहेत. आज एकनाथ शिंदे बंडाळी गटाचा पाचवा दिवस आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. तर तिकडे शिंदे गटानी आपल्या गटाचे ‘शिवसेना बाळासाहेब गट’ (Shivsena balasaheb Group) असे नाव ठेवले आहे. तसेच त्यांचे नेतेपद व काही आमदारांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर आता शिंदे गटाने सर्वोच्य न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. याचा परिणाम राज्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींवर होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे. आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक सुद्धा संपन्न झाली.
[read_also content=”आमच्या वडीलांच्या नावाने नको, तर तुमच्या वडीलांच्या नावानं मतं मागा – उद्धव ठाकरे https://www.navarashtra.com/maharashtra/ask-for-votes-in-the-name-of-your-father-not-in-the-name-of-our-father-uddhav-thackeray-296933.html”]
दरम्यान, बंडखोर आमदारांना परत येण्याची अजून संधी आहे, असं खासदार संजय राऊत (sanjay raut) म्हणाले होते. तसेच अनेकांनी या बंडाळी आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. पण सध्या आमदार परत येण्याच्या तयारीत नाहीत असं दिसतंय. कारण माजी गृहमंत्री दीपक केसरकरांनी (Deepak kesarkar) यांचे एक विधान समोर आलं आहे. सध्या राज्यातील परिस्थिती पाहता व वातावरण तापलं असताना, सुरक्षेच्या दृष्टीनं महाराष्ट्रात जाणं योग्य नाही असं माजी गृहमंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही शिवसेनेच्याच तिकीटावर निवडून आलेले आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडल्याच्या चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत, असं सुद्धा केसरकर म्हणाले.
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व आमदार दीपक केसरकर यांना सुरक्षा वाढवून द्यावी असे पत्र गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip walse patil) यांना दिले आहे. केसरकरांच्या या विधानावर आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी जोरदार टिका केली आहे. केसरकरांच्या सुरक्षेकरिता जर पोलीस कमी पडले तर माझी असलेली सुरक्षा काढून केसरकर यांना द्यावी, पण त्यांच्या सुरक्षा कमी झाली नाही पाहिजे अशी उपरोधिक टिका वैभव नाईक यांनी केली आहे.