मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु होणार असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत, तर राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु होणार असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जवळपास लिहून दिला आहे, आता फक्त सुनावणीसाठी अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यामुळे लवकरच याचा निकाल लागेल असे ठाकरे गटाने म्हटलंय
केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या काळात चार विधेयके संसदेत मांडली जाणार आहेत. याचा आज अजेंडा सादर होण्याची शक्यता आहे
मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस आहे, आज त्यांचे शिष्ठमंडळ सरकारसोबत चर्चा करणार आहे
मनोज जरांगे-पाटील आज पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय व भूमिका स्पष्ट करणार आहेत
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या कथित संभाषणाची चित्रफीत समाजमाध्यमांवरून फिरत आहे, यामुळं यावरुन दिघांवर मोठी टीका होत आहे,याचे पडसाद जालन्यात उमटत आहेत
मुख्यमंत्री महोदयांचे गुरुवार दि.१४ सप्टेंबर, २०२३ रोजीचे कार्यक्रम
दुपारी १२.०० वा.
ठाणे येथील विकासकामांबाबत बैठक
● स्थळ:- वर्षा निवासस्थान, मुंबई
दुपारी ०३.०० वा.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विकासकामांचा आढावा
● स्थळ:- वर्षा निवासस्थान, मुंबई
सायंकाळी ०५.०० वा.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयसंबंधी बैठक
● स्थळ:- वर्षा निवासस्थान, मुंबई
राहुल शेवाळे मारहाण प्रकरणी आज उच्च न्यायालयाच सुनावणी पार पडणार आहे
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
आशिया कप स्पर्धेत आज पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना होणार आहे, जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पोहचणार आहे. रविवारी भारतोसोबत त्यांची लढत होणारेय