मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज अनंतचुतर्थी म्हणजे आज १० दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळं सगळीकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
आज अनंतचुतर्थी म्हणजे आज १० दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे.
अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त, लालबाग-परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 10 हजार कर्मचारी, 764 जीवरक्षक, 198 कृत्रिम तलाव, गणेश विसर्जनसाठी BMC चा मेगाप्लॅन करण्यात आला आहे.
दगडूशेठ गणपती मंडळ निर्णयावर ठाम; चार वाजताच मिरवणुकीत सहभागी होणार, ‘श्री गणाधीश रथात दिमाखात निघणार मिरवणूक
गणेश विसर्जन, छत्रपती संभाजीनगर शहरातील ‘हे’ मार्ग पूर्णपणे बंद राहणार
नाशिकमध्ये मुख्य मिरवणूक 11 वाजेपासूनच, मिरवणूक मार्गावर 70 सीसीटीव्हींसह 4 ड्रोनची नजर
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच अनेक जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून पुणे शहरासह जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरसह कोकणातील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पण पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
शासकीय कार्यालये 5 दिवस बंद राहणार आहेत. 28.9.2023 ला अनंत चतुर्दशी, 29 ईद-ए-मिलाद, 30 ला शनिवार, 1 ला रविवार आणि 2.10.2023 रोजी महात्मा गांधी जयंती असल्याने शासकीय कार्यालये हे सलग पाच दिवस बंद असणार आहेत.
पुण्यात आज शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काढले आदेश
उल्हासनगर शहरातील विसर्जन घाटात ८ फुटांच्या पुढे असलेल्या उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनाला बंदी घालण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजिज शेख यांनी घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 आणि 3 ऑक्टोबरला तेलंगणाला भेट देऊ शकतात. पंतप्रधान सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि राज्यातील एका जाहीर सभेलाही संबोधित करतील. पंतप्रधान मोदी 2 आणि 5 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशात जाऊन सार्वजनिक सभा घेणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा राजस्थान दौऱ्यावर आहेत.
आजपासून नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरु होण्याची शक्यता आहे.