मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे, त्यामुळं राज्यासह देशात विविध कार्यक्रम व स्वच्छता अभियान पार पडणार आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
मुख्यमंत्री महोदयांचे सोमवार दि.२ ऑक्टोबर, २०२३ रोजीचे कार्यक्रम
सकाळी ११.०० वा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम, स्थळ:- वर्षा निवासस्थान, मुंबई
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे, त्यामुळं राज्यासह देशात विविध कार्यक्रम व स्वच्छता अभियान पार पडणार आहे.
राज्यातील काही भागात हलक्या व मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
आशियाई खेळ २०२३ : हांगझोऊ येथे रविवारी चालू असलेल्या आशियाई खेळ २०२३ च्या ८ व्या दिवशी भारताने पुरुष ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. आज स्पर्धेचा ९ वा दिवस आहे
हिंगोली – मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी 2 ऑक्टोबर रोजीवसमत तालुक्यातील कुरुंदा येथे जाहीर सभा होणार आहे. ही सभा 16 एकर परिसरामध्ये पार पडणार आहे. कुरुंदा येथे होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे. सभेसाठी हजारोंच्या संख्येने सकल मराठा समाज होणार सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असल्यामुळे मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका कोविड लसीकरण केंद्रांवर लसीकरण सेवा बंद राहणार आहे.
MGL ला मुंबई आणि आसपासच्या परिसरात CNG ची किंमत रु. 3/Kg आणि डोमेस्टिक PNG (DPNG) रु. 2/ SCM ने कमी केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आज, सोमवारी जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेटी देत अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
यंदा उत्सवाच्या ९०व्या वर्षी जवळपास साडेतीन किलो सोने आणि ६४ किलो चांदी ही भाविकांनी लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केलेली आहे; अशी माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.